घराघरात सावित्री उत्सव या संकल्पने अंतर्गत डोंबिवलीत `सावित्री पहाट`


डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्यातर्फे डोंबिवलीत  `सावित्री पहाट` कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा प्रवीण देशमुख  यांनी करोनाचे सर्व नियम सांभाळून क्रांतीज्योती सावित्री जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

 


       कार्यक्रमाला लोढा हेवन परिसरातील विविध चळवळीतील अनेक सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होतेठाणे येथील पुरोगामी जलसाचे  विजय देशकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाची बहारदार सुरुवात केलेया कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या नंदिनीताई जाधव उपस्थित होत्या.          राष्ट्रसेवा दलाच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व महामंत्री सिरत सातपुतेअंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रट्रस्टचे ट्रस्टी गणेश चिंचोलेमोहने येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी डी.जे.वाघमारेमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या व कवियत्री अनिता देशमुख सरदार यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

 

 

          कार्यक्रमात डोंबिवली -लोढा येथील रहिवासी संगीता सरखोत यांनी त्यांच्या घरी घरकाम करणाऱ्या बाईच्या मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची संकल्प जाहिर केला.प्रा.प्रवीण देशमुख यांनी  शैक्षणिक साहित्याचे वाटप  करून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले.तर याच कार्यक्रमाचा भाग म्हणून  सुरेखा  देशमुख  यांच्या तर्फे अनेक गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले       कार्यक्रमात चित्रकार उदय देशमुख  यांनी काढलेल्या शहीद डॉ नरेंद्र दाभोळकरगोविंद पानसरेगौरी लंकेशडॉ कलबुर्गी यांच्या पोट्रेट्स  चे प्रदर्शन भरवण्यात आले होतेक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मोत्सव हा घराघरात साजरा व्हायला पाहिजे आणि याच भावनेतून त्याची सुरुवात आपण `सावित्री पहाट या कार्यक्रमाच्या निमित्ताने  केली आहे असे विचार या कार्यक्रमाचे संयोजक प्रादेशमुख यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments