ज्येष्ठ पत्रकार किशोर पगारे यांना अंबरनाथ जनमत पत्रकारिता पुरस्कार प्रदान...


डोंबिवली ( शंकर जाधव ) जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीचे ठाणे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार किशोर पगारे यांना 'अंबरनाथ  जनमत  पत्रकारिता पुरस्कार' प्रदान करण्यात करून गौरविण्यात आले.


        अंबरनाथ जनमत साप्ताहिकचे संपादक पांडुरंग रानडे यांनी सामाजिक, शैक्षणिक, आणी पत्रकारितेतील  विविध व्यक्तींना त्यांच्या कार्याबद्दल मागील १३वर्षा पासून सन्मानित केले आहे.आणि एक सामाजिक उपक्रम सुरू ठेवला आहे.यंदाचा अंबर ₹नाथ जनमत पत्रकारिता २०२२ पुरस्कार जय महाराष्ट्र चैनलचे प्रतिनिधी किशोर पगारे  यांना प्रदान  करण्यात आला. 


              यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद लिमये  ( विधीं  मंडळ वार्ताहर संघ, मुंबई) उपस्थित होते त्यांच्या व अंबरनाथ जनमत चे संपादक पांडुरंग रानडे  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. किशोर पगारे हे मागील २० वर्षा पासून पत्रकारितेत असून इलेक्ट्रॉनिक मीडियात  एक कॅमेरामन सहाय्यक ते पत्रकार असा प्रवास असून ठाणे जिल्ह्यातील कल्याण ,डोंबिवली, ते बदलापुर अशा कार्यक्षेत्र बसलेल्या शहरात विविध बातम्यांच वृत संकलन ते करीत आहेत.

Post a Comment

0 Comments