ग्रामीण भागातील १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

■बारा केंद्रावर लसीकरणाची सुविधा; पहिलाच दिवशी तरुणाईचा चांगला प्रतिसाद..


ठाणे दि.३ जाने ( जि.प)  जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. पहिल्या टप्प्यात बारा केंद्रावर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून पहिल्याच दिवशी लसीकरणाला तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळाला.


           जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील पाचही तालुक्यात लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय शहापूर, भिवंडी, ग्रामीण रुग्णालय मुरबाड तसेच शहापूर तालुक्यातील वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्र, अंबरनाथ तालुक्यातील  वांगणी प्राथमिक आरोग्य केंद्र, कल्याण तालुक्यातील खडवली प्राथमिक आरोग्य केंद्र, भिवंडी तालुक्यातील आनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मुरबाड तालुक्यातील शिवळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जीवनदिप कॉलेज गोवेली आणि सेक्रेड हायस्कूल वरप, छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल, भिवंडी  अशा एकूण बारा  ठिकाणी लसीकरण सुरू झाले आहे. अशी माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे यांनी दिली.


         या लसीकरण केंद्रावर सकाळी ९ ते ५ यावेळेत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती लसीकरण सत्र प्रमुख डॉ.अंजली चौधरी यांनी दिली.


 जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या उपस्थित शुभारंभ


          जिल्हातील विविध बारा ठिकाणी १५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले. या लसीकरण केंद्रावर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थित शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र शिवले येथे लसीकरणास शुभारंभ करण्यात आला.

Post a Comment

0 Comments