तर हक्कभंग टाकेल' सीनियर इन्स्पेक्टरला भाजपा आमदारांची तंबी

■कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांचा सोशल मिडीयावर व्हिडीओ वायरल...


कल्याण , प्रतिनिधी : अजून हक्कभंग टाकला नसून, तुम्ही फक्त पैसे वसुलीसाठी आहात काआणि भाईगिरी करीत आहात काअसा सज्जड दम कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे सीनियर पोलीस इंस्पेक्टर बशीर शेख यांना कल्याण पूर्वचे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी दिला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चिला जात आहे.


३१ डिसेंबर रोजी एका विनयभंगाच्या तक्रारी संदर्भात भाजपाचे आमदार गणपत गायकवाड तर दुसऱ्या बाजूने शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड कोळसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये आले होते. पोलीस याबाबत दोन्हीकडील तक्रार ऐकून घेत दाखल करण्याचे कामकाज सुरू करण्यात आले होते. याच दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांनी कोळसेवाडीचे सीनियर इन्स्पेक्टर बशीर शेखगुन्हे विभागाचे इन्स्पेक्टर गवळी व इतर पोलिस अधिकाऱ्यांचा समोरच बाचाबाची करण्यास सुरवात केली. आमदार गायकवाड यांनी तुम्ही माझ्याशी भाईगिरीची भाषा करीत असून तुमच्यावर अजुन मी हक्कभंग टाकला नसून लक्षात ठेवण्याचे बशीर शेख यांना सुनावले.


गाडीतून उतरल्या बरोबर तुम्हीच भाईगिरीची भाषा करीत असल्याचे बोल सीनियर इन्स्पेक्टर बशीर शेख यांनी आमदार गणपत गायकवाड यांना सूनावित भाईचा कसला  विषय याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर मात्र चांगलाच वायरल झाला आहे. तर याबाबत आमदार गणपत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Post a Comment

0 Comments