बाऊन्सर बनून फिरणाऱयानी आमच्यावर टीका करू नये - मनसे आमदार राजू पाटील

■डोंबिवली 27 गावातील अमृत योजनेतील जलकुंभाच्या  जागेवरून शिवसेना-मनसेत श्रेयवाद...कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  बाऊन्सर बनून फिरणाऱयानी आमच्यावर टीका करू नये अशी टीका मनसे आमदार  राजू पाटील यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांवर केली आहे. यामुळे  डोंबिवली २७ गावातील अमृत योजनेतील जलकुंभाच्या  जागेवरून शिवसेना-मनसेत श्रेयवाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. तर कोरोना हा आधी आजार होता आता त्याचा बाजार झाला असल्याची टीका देखील राजू पाटील यांनी केली आहे. 


           महानगरपालिकेत समविष्ट झालेल्या २७ गावात अनेक वर्ष पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी मिटावा यासाठी शासनाच्या `अमृतयोजना` अमंलात आणली जात आहे. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत २७ गावांपैकी ७ गावांमध्ये जलवाहिन्या टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 


          मनसेचे कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे सांगितले. मात्र युवा सेना पदाधिकारी तथा शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी हे काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने झाल्याचे सांगत मनसेने शिवसेनेच्या कामाचे श्रेय घेऊ नये, जनतेच्या हितासाठी शिवसेनेला मदत करावी असा सल्ला दिला. 


         या टीकेचा समाचार घेताना राजू पाटील यांनी पाणीप्रश्नी मी पाठपुरावा केला त्याचे माझ्याकडे पत्र आहेत मी, कुठे बोललो तुम्ही पाठपुरावा केला नाही, ठाण्याचे मालक सांगतील तितकेच हे  बोलतील, ते किती वेळ सहन करणार, आमच्या सहनशक्तीला मर्यादा आहेत. मालक म्हणून फिरायचं तर बाउन्सर म्हणून फिरतात त्यांनी आमच्यावर टीका करू नये अशी सनसनाटी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी दीपेश म्हात्रे यांच्यावर   केली आहे. 


         तर कोविडं हा आजार होता आता त्याचा  बाजार केला  जात आहे. जुन्या कोविड सेंटरचे आता खरतर ऑडिट व्हायला पाहिजे. जुने सामान होते ते  कुठे गेले, ते  कसं वापरतात ते बघायला पाहिजे. कोविड  संपत असताना ते  सेंटर बनवला  होता ते परत चालू करत असून  त्यातील जुनं सामान होतं त्याचं काय झालं ते वापरणार आहात की नाही याचे पण कुठेतरी ऑडिट व्हायला पाहिजे असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments