युवकांना त्यांचे भले कुठे आहे, ते समजेय- डाॅ.जितेंद्र आव्हाड मनसेचे रवींद्र भऊर यांच्यासह शेकडो जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश


ठाणे (प्रतिनिधी) : -  युवकांना आता समजू लागले आहे की आपले भले कुठे आहे. त्यामुळेच ते राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री ना. डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी केले. मनसेचे माथाडी नेते रवींद्र भऊर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळेस डाॅ. जितेंद्र आव्हाड बोलत होते. 


      संभाजी नगर येथील मनसेचे कार्यकर्ते रवींद्र भऊर यांनी आपल्या शंभर कार्यकर्त्यांसह डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे हे उपस्थित होते. रवींद्र भऊर यांची मनसेतील आक्रमण कार्यकर्ते अशी ओळख होती. संभाजी नगर येथील अनेक सामाजिक प्रश्नांवर आक्रमक होऊन आंदोलने उभी केली आहेत. परिसरातील लोकप्रिय नेतृत्व म्हणून त्यांना समाजमान्यता आहे. 


       यावेळी डॉ. आव्हाड म्हणाले की, युवकांसाठी राष्ट्रवादी आणि पवारसाहेब हे काय काम करीत आहेत,  हे समाजमाध्यमांद्रारे तरूणांना समजत आहे. त्यामुळे तरूण राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहे. आपणही या तरुणांशी कधीच नेता म्हणून वागत नसून मित्र म्हणून जवळ करीत आहोत. शिवाय, उमेदवारी देतानाही आपण तरूणांनाच प्राधान्य देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments