पलावा सिटीतील नागरिकांना मिळणार ६६ टक्के करमाफी

■केडीएमसीचे मनसे आमदार राजू पाटील यांना आश्वासन..


 

कल्याण,  कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या पलावा सिटी मधील २५ हजार फ्लट धारकांना महिन्याभरात दिलासा मिळणार आहे. शहरातील पहिली टाऊन शिप असलेल्या या सिटीला ओपन लँन्ड टॅक्सच्या धर्तीवर ६६ टक्के सूट देण्यास एमएमआरडीएने मान्यता दिली आहे. हा विषय येत्या महिनाभरात मार्गी लागणार असल्याचे केडीएमसीचे कर विभाग प्रमुख कुळकर्णी यांनी आमदार राजू पाटील यांना आश्वासन दिले आहे. 


 

मनसे आमदार राजू  पाटील यांनी आज केडीएमसी कर विभाग प्रमुख कुळकर्णी यांची भेट घेतली. यावेळी मनसे आमदार राजु पाटील यांनी  पलावा ही इंटीग्रेटेड टाऊन शीप असून या टाऊनशीपला मान्यता देताना सरकारने बिल्डरला काही सवलती दिल्या होत्या. त्याच प्रमाणे त्याठीकाणी घरे घेणाऱ्या मालमतधारकास त्याच्या मालमत्ता करात ६६ टक्के सूट दिली जाणार होती.



 त्याचा जीआर सरकारने २०१६ साली काढला आहे. मात्र महापालिकेने सूट दिलेली नाही. २५ हजार प्लॅटधारकांकडून जवळपास १५  कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. प्लॅटधारकांनी जवळपास १० कोटी रुपये जास्तीचा कर दिला आहे. ६६  टक्के सूट दिली जावी याकडे लक्ष वेधले आहे.



 यासंदर्भात कर विभागाचे प्रमुख कुळकर्णी यांनी या विषयीचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे  पाठविला होता. कारण टाऊन शीपला परवानगी एमएमआरडीएने दिली होती. त्यांच्याकडून पत्र आले आहे. सूट देण्याचा विषय हा धोरणात्मक असल्याने त्याची पहिली बैठक अतिरिक्त आयुक्त स्तरावर येत्या १३ जानेवारी रोजी घेतली जाणार आहे. त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाईल. महिन्याभरात हा विषय मार्गी लागणार असल्याचे सांगितले. 


 

पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या  गावातील गावठाण जमिनींना पालिका प्रशासनाकडून सरसकट कर आकारणी केली जात असून या रकमा कितीतरी मोठ्या आहेत. यामुळे नागरिक त्रस्त असून नवी मुंबईच्या धर्तीवर गावठाण जमिनींना ३  प्रकारची वर्गवारी करून कर आकारणी केली जावी. आणि जुन्या घराची डागडुजी करणाऱ्या रहिवाशांना दिलासा दिला जावा अशी मागणी आमदार पाटील यांनी पालिका प्रशासनाला केली आहे.


 

मलंगगडावर फिनिक्युलर रेल्वेचे काम मागील अनेक वर्षापासून सुरु असून आता शासनाकडून पुन्हा ठेकेदार बदलण्याचा हालचाली सुरु आहेत. याबाबत बोलताना आमदार पाटील यांनी पुलरस्ते यासारख्या प्रत्येक कामात ठेकेदार बदलून कोटेशन वाढवून पुन्हा पुन्हा मलिदा खायचा हीच कामे राज्य शासनाची सुरु असल्याचा आरोप करत मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

Post a Comment

0 Comments