ममता दिना निमित्त युवा सेनेच्या वतीने मोफत संगणक प्रशिक्षण शिबीर


कल्याण, प्रतिनिधी  : मांसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या स्मरणार्थ ममता दिनानिमित्त युवासेना कल्याण जिल्हा अधिकारी अभिषेक मोरे आणि युवासेना कल्याण पश्चिम विधानसभा अधिकारी अभिजीत बोले यांच्यातर्फे मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये संगणकाच्या वापरापासुन ते नेट सर्फिंग सोबत सर्व ऑनलाईन कामाची माहिती देण्यात येणार आहे. 


          यावेळी शिवसेना विधानसभा संघटक अरविंद मोरेउपशहर प्रमुख रवी पाटीलशिवसेना उपशहर संघटक विलास भोईर युवासेना सहसचिव योगेश निमसे आदींसह शिवसैनिक-युवासैनिक उपस्थित होते.


या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणाचे महत्व समजावुन भावी शिक्षणासाठी  माजी सभागुह नेते अरविंद मोरे, योगेश निमसे, प़भुदास नाईक यांनी युवक आणि युवतीना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मयुर मोरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निकॅड कॉम्प्युटर एकॅडमी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments