नो दारू नो वाइन.. प्या दूध रहा फाईन ....महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम


डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती डोंबिवली शाखेच्या वतीने 'चला व्यसनाला बदनाम करू या'  या उपक्रमा अंतर्गत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी  'द दारुचा नव्हे द दुधाचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नो दारू नो वाइन..  प्या दूध  रहा फाईन ,  द दारूचा नव्हे, तर द दुधाचा, हॅप्पी न्यू इयर, हॅप्पी न्यू इयर ,नो दारू नो बियर अशी घोषणाबाजी करण्यात आली.


      या कार्यक्रमांतर्गत नागरिकांना  दूध वाटप करण्यात आले.  नववर्षाचे स्वागत करताना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला व या उपक्रमाबद्दल आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या. अनेकांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोबत जोडून घेण्यासाठी नाव नोंदणी केल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रवीण देशमुख  यांनी दिली.


       तरुण पिढीने दारूच्या व्यसनी  न जाता व्यसनां पासून दूर राहायला हवे,  व्यसनाचे मार्ग हे अंधश्रद्धेकडे नेतात असा संदेश यातून दिला. यावेळी सर्व उपस्थितांना  एक ग्लास दुधाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात  अंनिस बरोबरच समविचारी संघटनांचे तसेच राजकीय पक्षांचे  कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याप्रसंगी येणाऱ्या जाणार्‍या  नागरिकांनी कार्यक्रमाबाबत कौतुक केले.
   

        कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र या ट्रस्ट चे ट्रस्टी गणेश चिंचोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रोहित दादा सामंत, डोंबिवली विधानसभा क्षेत्राचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, शशिकांत म्हात्रे, निमेश पाटील, सुशील सामंत,अंनिसचा कार्यकर्त्यां व कवियत्री अनिता देशमुख, नितीन सोनवणे, उदय देशमुख ,संध्या देशमुख आदी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. 


         नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांना  जागवत त्यांनी दाखवलेल्या द पुरोगामी व विवेकवादी विचारांचा वसा- वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी केला. तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नंतर अहिंसेच्या मार्गाने एवढे मोठे जनआंदोलन उभे करणारे डॉ. नरेंद्र दाभोळकर हे एकमेव उदाहरण आहे असे विचार  रोहित दादा सामंत यांनी यावेळी  व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  प्रकाश चव्हाण, सुशील सामंत सह अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचा सहभाग होता.

Post a Comment

0 Comments