राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या नियुक्त्या जाहीर

 


ठाणे (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल ठाणे शहर कार्यकारिणीतील पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पदाधिकार्‍यांना पदवाटप करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष मा. खा. आनंद परांजपे आणि ओबीसी सेलचे ठाणे शहराध्यक्ष गजानन चौधरी उपस्थित होते. 


       गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये ओबीसी सेलची कार्यकारिणी आणि पदवाटप करण्यात आले. यावेळी मुंब्रा येथील शिवसैनिक मन्सूर डोसानी यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची ओबीसी सेलच्या कळवा- मुंब्रा विधानसभाक्षेत्राध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 


       तर,  कोपरी-पाचपाखाडी विधान सभाक्षेत्रा ध्यक्षपदी प्रशांत उदमाने, कोपरी पाचपाखाडी कार्याध्यक्षपदी भारत पवार, ठाणे शहर सरचिटणीसपदी विजय मताने, कळवा-मुंब्रा संघटकपदी कृष्णा सोनी, ठाणे शहर विधानसभाक्षेत्राध्यक्षपदी मंगेश वाघे, शहर सरचिटणीसपदी भानुदास घुगे, ठाणे शहर विधानसभाक्षेत्र कार्याध्यक्षपदी राज कणसे, वॉर्ड क्रमांक दोनच्या अध्यक्षपदी वैभव चौधरी, वॉर्ड क्रमांक 3 च्या अध्यक्षपदी कल्पेश भिमरा आणि सुजीत चोपडे, प्रदीप शिंगे, रवी दपटे, दर्शन पालकर, विशाल बोरडे, राकेश टाक यांची कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. 


         ‘ओबीसी सेलच्या कार्यकारिणीच्या मदतीने गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तळागाळात जनजागृती करुन ओबीसी आरक्षणाबााबत केंद्र सरकारच्या फसव्या धोरणांचा पर्दाफाश करुन ओबीसींमध्ये जनजागृती करु, असे यावेळी गजानन चौधरी यांनी सांगितले.

Post a Comment

1 Comments