ठाणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षपदि वैशाली भोसले यांची निवड


ठाणे, प्रतिनिधी : ठाणे शहर (जिल्हा) महिला काँग्रेस अध्यक्षपदि मुंब्रा परिसरातील महिला पदाधिकारी वैशाली भोसले याची निवड करण्यात आल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश महिला काॅग्रेस अध्यक्ष अॅड.संध्याताई सव्वालाखे यांनी केली आहे.

           अखिल भारतीय महिला काँग्रेस सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी ममता भूपेश यांनी राज्यातील काही जिल्हाध्यक्ष व प्रदेश समन्वयक याची नावे केली यामध्ये ठाणे शहर महिला अध्यक्षपदी वैशाली भोसले यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

         सौ.वैशाली भोसले या विद्यमान मुंब्रा ब्लाॅक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदि कार्यरत असून विविध विषयांवर आंदोलन केले आहे प्रामुख्याने मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामांविरोधात त्यानी मोहिम हाती घेतली होती,महिलानी समाजकारण व राजकारणात सक्रिय राखण्याकरिता त्यांनी विविध शिबिर घेतली असताना विद्यार्थ्यांसाठी त्यानी विविध उपक्रम राबविले आहेत.


         त्यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यां कडून त्याचे स्वागत करण्यात येत आहे त्यांच्या नियुक्ती बद्दल काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड विक्रांत चव्हाण यांनी स्वागत करून आगामी महिला संघटन अधिकाधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments