सामाजिक कार्यकर्ते विनोद भोईर यांना मानद डॉक्टरेट प्रदान

 


कल्याण : कल्याणमधील समाजसेवक तथा उद्योजक विनोद भोईर यांना सामाजिक कार्याबद्दल दिल्ली येथे द अमेरिकन युनिवर्सिटीच्या वतीने मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.  दिल्ली येथील फोर्चून इन ग्राझिया याठिकाणी पार पडलेल्या समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. 

   

                   बांधकाम क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासून विनोद भोईर यांनी अनेकांच्या संकटकाळात धावून त्यांना मदतीचा हात दिला आहे. आपले स्वतःचे घर असावे अशी प्रत्येक सर्वसामान्यांची इच्छा असते त्यांच्या या स्वप्नांना वास्तवात उतरविण्यासाठी अनेक कुटुंबांना त्यांनी मदत केली आहे. तर अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल कल्याणमधील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी विनोद भोईर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Post a Comment

0 Comments