जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया AGF ट्रॅम्पोलिन वर्ल्ड कप स्पर्धेत भोईर जिमखाना मधील खेळांडूची निवडडोंबिवली ( शंकर जाधव ) ट्रॅम्पोलिन वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ निवडण्यासाठी निवड चाचणी ९ जानेवारी रोजी डोंबिवली येथील श्रवण स्पोर्ट्स अकादमी येथे झाली. महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या सहकार्याने या चाचण्या घेण्यात आल्या. पवन भोईर (GFI - ट्रॅम्पोलिन समिती अध्यक्ष) हे स्पर्धेचे प्रभारी होते. भारतीय जिम्नॅस्टिक् फेडरेशनच्या निवड समिती सदस्यांच्या उपस्थितीत निवड चाचणी घेण्यात आली. अध्यक्ष अशोक कुमार साहू, सदस्य अजय पाल सिंग आणि वर्षा उपध्यक्ष आहेत.          एकत्रित गुण पत्रिकेनुसार  पुरुष जिम्नॅस्ट आणि ३ महिला जिम्नॅस्टचा संघ निवडण्यात आला. जिम्नॅस्टची नावे खालीलप्रमाणे आहेतपुरुष जिम्नॅस्ट- आदर्श भोईर – महाराष्ट्र(भोईर जिमखाना), राहुल नेगी –एसएससीबी, उदित चव्हाण – SSCBमनू मुरली – SSCB तर महिला जिम्नॅस्टमध्ये  राही पाखले – महाराष्ट्र(भोईर जिमखाना), यामीन शेख - आंध्र प्रदेश, सिद्धी ब्रीद  - महाराष्ट्र (भोईर जिमखाना) यांची निवड झाली.          कार्यक्रमादरम्यान कोरोना नियमांचे पालन करण्यात आले होते.या कार्यक्रमादरम्यान डॉक्टरांसह एक रुग्णवाहिका उपस्थित होती. सदर स्पर्धेस माजी आमदार रमेश पाटील, मुकुंद भोईर व आमदार प्रमोद ( राजू )पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. या स्पर्धेकरिता आंतराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक पवन भोईर यांनी विशेष मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली व सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments