भिवंडीतील चिंबीपाडा आश्रमशाळेत 30 जणांना कोरोना लागण, पालकांनी गोंधळ घालत बाधित मुलांना घेऊन काढला पळ,प्रशासनाची वाढली डोकेदुखी..


भिवंडी दि 4  (प्रतिनिधी ) देश तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असतानाच ओमायक्रॉन या नव्या विषाणूने हाहाकार माजविण्यास सुरवात केली असून भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा येथील शासकीय आश्रमशाळेतील वस्तीगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांना सर्दी खोकला जाणवू लागल्याने मुख्यध्यापक आर एन चौधरी यांनी नजीकच्या चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांची तपासणी केली असता 14 मुली 4 मुलांसह अधीक्षक व स्वयंपाकी अशा एकूण 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले .


           त्यानंतर खबरदारी म्हणून आश्रमशाळा वस्तीगृह व शाळेतील विद्यार्थ्यांची अँटीजेन चाचणी घेण्यास सुरवात केली असता ही बातमी वाऱ्याच्या वेगाने परिसरात पसरली त्यानंतर आश्रमशाळेत पालकांनी एकत्रित होऊन गोंधळ घालीत चाचणी करण्यास व बाधित विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यास मज्जाव करण्यास सुरुवात केली .या आश्रमशाळेत एकूण 602 विद्यार्थ्यांपैकी 476 विद्यार्थी हजर होते.त्यापैकी 187 विद्यार्थी वस्तीगृहात 140 विद्यार्थी हजर होते .व्यवस्थापनाने 175 जणांची तपासणी केली असता त्यामध्ये 22 मुली ,6 मुले व 2 कर्मचारी असे एकूण 30 जण लागण झालेले आढळून आले .


          मात्र पालकांनी गोंधळ घालीत लागण झालेल्या विद्यार्थ्यांसह चाचणी झालेले ,न झालेले अशा सर्वच विद्यार्थ्यांना घेऊन पालक घराकडे पसार झाले...
 या घटने नंतर आरोग्य यंत्रणा,  आदिवासी प्रकल्प विभाग,पोलिस व महसूल प्रशासन या घरी निघून गेलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेत असून त्यांना शोधून आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून गृह विलगिकरण अथवा रुग्णालयात दाखल करण्या बाबत निर्णय घेणार असल्याची माहिती आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आर एन चौधरी यांनी दिली आहे.           दि.03 जानेवारी रोजी ही घटना दुपारी 12 वाजता उघडकीस आली मात्र तालुका आरोग्य विभाग ,पंचायत समिती प्रशासनाला सायंकाळ पर्यंत या घटनेची माहितीच नसल्याने फक्त रुग्णवाहिका आणून ठेवल्याने आदिवासी पालक भयभीत होत त्यांनी आपल्या मुलांना घेऊन पळ काढला त्यामुळे या सर्वच यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे एवढे नक्की...

Post a Comment

0 Comments