भिवंडीत एकाच रात्री दोन आगीच्या घटना ,2 कामगार होरपळले..


भिवंडी दि 7 (प्रतिनिधी ) भिवंडी परिसरात एकाच रात्री मोजेच्या कारखान्याला आग लागली तर पहाटेच्या सुमारास  ब्ल्यू डार्ट च्या गोदामाला पहाटे भीषण आग लागून त्यामध्ये  दोन कामगार होरपळून जखमी झाल्याच्या दोन घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती..


         पहिल्या आगीच्या घटनेत  भिवंडी तालुक्यातील दापोडा येथील इंडियन कॉर्पोरेशन मधील  सॉक्स (मोजे ) बनवण्याच्या कारखान्याला काही वेळा पूर्वीच भीषण आग लागली असून  अग्निशमक  दलाच्या 3 गाडया घटनास्थळी दाखल होऊन  आग विझविण्याचा प्रयत्न केला  यामध्ये महागड्या मशीन आणि सॉक्सचा कच्चा माल आणि महागडे सॉक्स जळून खाक झाला आहे,या कारखान्यासमोर  लोकवसाहत आणि माजी सरपंचाचे घर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते .


   
           या आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून यामध्ये जीवितहानी झाली नाही मात्र नुकसान मोठे झाले आहे. तर दुसऱ्या घटनेत  दापोडा येथील मोजे च्या  कारखान्याला रात्री लागलेली भीषण आग विझल्यानंतर मुंबई - नाशिक महामार्गावरील  वडपे येथील ब्ल्यू डार्ट च्या गोदामाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याने  या आगीत दोन कामगार भाजल्याने जखमी झाले आहेत .


          यावेळी तेथील ढाब्यावरील कामगारांनी धाव घेऊन कामगारांना काही कामगारांना बाहेर काढून जखमी दोघांना रुग्णालयात पाठवले असून याची माहिती मिळताच अग्निशमक दलाने घटनास्थळी जाऊन दिड तासाने आग आटोक्यात आणली आहे, आगीचे कारण समजू शकले नसून यामध्ये दोन कामगार भाजल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे मात्र एकाच रात्री दोन आगीच्या घटना घडल्याने भिवंडीत खळबळ माजली आहे ...

Post a Comment

0 Comments