भिवंडीत 18 बंडखोर काँग्रेस नगरसेवकांना कोकण आयुक्तांनी दिले अभय, बंडखोरी विरोधात दाखल याचिका फेटाळली



भिवंडी दि 1 (प्रतिनिधी ) भिवंडी महानगरपालिकेच्या 5 डिसेंबर  2019 रोजी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक 47 नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षातील 18 नगरसेवकांनी बंडखोरी करीत कोणार्क विकास आघाडीच्या  पारड्यात आपलं मतदान करीत सत्तेत सहभाग घेतला होता. त्या विरोधात काँग्रेस नगरसेवक माजी महापौर जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे कॉंग्रेस नगरसेवकांच्या बंडखोरी विरोधात याचिका दाखल  करून नगरसेवक पदावरून बडतर्फ  करण्याची मागणी केली होती.


           या याचिकेवर कोकण विभागीय आयुक्तांनी निकाल देताना बंडखोरी विरोधात दाखल याचिका फेटाळून लावली.या निकालाने बंडखोरांच्या गटात आनंदाचे वातावरण पसरले असून दरम्यानच्या काळात या सर्व बंडखोर नगरसेवकांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भिवंडी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू उपमहापौर इम्रान वली खान माजी उपमहापौर अहमद सिद्दीकी यांसह बंडखोर नगरसेवकांनी समर्थकांसह महानगरपालिका मुख्यालया बाहेर गाण्याच्या तालावर नृत्य करीत आनंद सोहळा साजरा केला असून या निकालाने भिवंडी पालिका वर्तुळात काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चपराक लगावली असल्याचे बोलले जाते.


          विशेष म्हणजे कोकण विभागीय आयुक्तां कडील याचिकेवर निकाल देण्यास उशीर होत असल्याने माजी महापौर जावेद दळवी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावर 31 डिसेंबर पर्यंत निकाल घेण्याचे आदेश उच्च न्यायलायने दिले होते.

Post a Comment

0 Comments