भिवंडीत शासकीय आश्रमशाळेतील 14 मुली व 4 मुले 2 कर्मचारी असे एकूण 20 जणांना कोरोनाची लागण...


भिवंडी दि.3 (प्रतिनिधी ) कोरोनाची तिसरी लाट वाढत असताना भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील चिंबीपाडा येथील शासकीय आश्रमशाळेतील 14 मुली व 4 मुले,2 कर्मचारी असे एकूण 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यात खळबळ माजली असून सर्व विद्यार्थ्यांची अँटीजेन चाचणी करण्यासाठी चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक दाखल झाले तर पालकांनी आपल्या मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी आश्रमशाळेत  गर्दी केली आहे.


          या शासकीय आश्रमशाळेत तब्बल 470 मुल, मुली उपस्थित असून कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महत्वाची बाब म्हणजे आजच 15 ते 18 वयोगटातील मुला - मुलींना लसीकरण सुरु केले असून आजच मुलांचा प्रकार समोर आल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे ...

Post a Comment

0 Comments