जिल्हास्तरीय T 20 मास्टर्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत डोंबिवली संघ विजेताकल्याण, प्रतिनिधी  : कल्याण येथील संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी  यांच्या वतीने  स्वर्गीय यशवंतराव ओंबासे (पोलीस हवालदार) यांच्या स्मरणार्थ ठाणे जिल्ह्यातील 5 वी 10 वर्षाखालील खेळाडूंसाठी मास्टर ट्रॉफी टी-20 स्पर्धेत डोंबिवली च्या जी एम क्रिकेट अकादमी ने कल्याणच्या संतोष स्पोर्ट्स अँकॅडमी चा 9 विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात टिळक प्रजापती याला मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आले. त्याने 46 बॉल मध्ये 43 धावा केल्या त्यामध्ये 5 चौकाराचा समावेश होता.


स्वर्गीय अरविंद धाक्रास यांच्या स्मरणार्थ 12 वर्षाखालील लिटिल चॅम्प्स टी-20 या क्रिकेट स्पर्धेत पाब क्रिकेट क्लब भिवंडी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आठ विकेट गमावत 20 ओव्हर मध्ये 83 धावांपर्यंत मजल मारली. तर संजीवनी क्रिकेट अकादमीबांद्रा अवघे दोन विकेट गमावत 15 ओव्हर मध्ये 85 धावा करत लिटिल चांप ट्रॉफी वर आपले नाव कोरले. या सामन्यात हर्षवर्धन बाऊमुख याने 14 बॉल मध्ये 21 धावा फटकावत 2 विकेट ही घेतल्या . सामन्यात मॅन ऑफ द मॅच हा किताब देऊन त्यांना गौरवण्यात आले.


 गेल्या चार वर्षापासून ठाणे जिल्ह्यामध्ये दहा वर्षाखालील व बारा वर्षाखालील क्रिकेट खेळाडूंसाठी या स्पर्धेचे आयोजन संतोष स्पोर्ट्स अकॅडमी कल्याण यांच्या वतीने करण्यात येत असून या स्पर्धेतून छोटा मुलांना क्रिकेटमध्ये वाव मिळावा तसेच छोटया खेळाडूंनी क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे असे प्रतिपादन स्पर्धा आयोजक व प्रशिक्षक संतोष पाठक यांनी बोलताना व्यक्त केले. या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभासाठी माजी आमदार संजय दत्तनगरसेवक जयवंत भोईरकांग्रेस पक्षाचे चिटणीस ब्रिज दत्त व आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप ओबासे हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments