परिवहन बससेवेसाठी MH05 वाहतूक प्रवासी संघटनेचा पुढाकार


डोंबिवली ( शंकर जाधव ) MH05 वाहतूक प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाचे  महाव्यवस्थापक  दीपक सावंत यांची भेट निवेदन दिले. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. मेंटेनेन्ससाठी गेलेल्या बस लवकरच रस्त्यावर उतरवू व  ३ ते ४ महिन्यात नवीन इलेक्ट्रीक बस देखील केडीएमटीच्या ताफ्यात येणार आहे.


        त्यामुळे नागरिकांची व्यवस्थित सोय करता येईल अशी माहिती  महाव्यवस्थापक  दीपक सावंत यांनी संघटनेला दिली.पुन्हा  १५ दिवसानंतर  या सर्व आश्वासनांचा आढावा घेण्यासाठी भेटून चर्चा करू असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीत MH05 वाहतूक प्रवासीसंघटनेच्या अध्यक्षा वंदना सिंह सोनवणे, सचिव  प्रसाद आपटे, व सहसचिव प्रथमेश अंकलकोटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments