राज्य चॉकबॉल स्पर्धेत ठाणे संघाची चमकदार कामगिरी


कल्याण , प्रतिनिधी  : जिल्हा क्रीडा संकुलगोंदिया येथे आयोजित १२ वी राज्य चॉकबॉल अजिंक्यपद व निवड स्पर्धा संपन्न झालीविशेष म्हणजे २३ महिन्यानंतर कोविड काळानंतर झालेल्या या स्पर्धेत महिला व पुरुष मिळून २२ जिल्हे सहभागी झाले होते. यात ठाणे जिल्ह्याच्या दोन्ही महिला व पुरुष संघांनी आपली चमकदार कामगिरी बजावली.


 महिला संघाने आपली सुवर्ण घोडदौड सुरू ठेवत सलग तिसऱ्या वर्षी पालघर संघाला अंतिम सामन्यात धूळ चारत प्रथम क्रमांक पटकावलातर पुरुष संघाने सुद्धा मागच्या वर्षीच्या पराभवाचा वचपा काढत बुलढाणा संघाला उपांत्य सामन्यात एकतर्फी हरवत अंतिम सामन्यात धडक मारली. अमरावती जिल्हा व ठाणे संघात झालेल्या अंतिम सामन्यात अमरावती संघाने निसटता विजय मिळवत प्रथम तर ठाणे संघ दुसऱ्या स्थानावर राहिला 


या सामन्यात ठाणे संघाच्या विक्रम काळेकरण गवळीएकनाथ भोईररुपेश लोखंडेशंकर साळवेशुभम चिकने यांनी उत्कृष्ट खेळ केला असे ठाणे जिल्हा संघाचे व्यवस्थापक निलेश आरेकर यांनी सांगितले. अमरावती तर्फे श्रीजित खरड व अजिंक्य बाभूलकर यांनी अप्रतिम खेळ केला. महाराष्ट्र राज्य चॉकबॉल संघटनेतर्फे देण्यात येणारा स्टार ऑफ महाराष्ट्र हा मानाचा सन्मान विक्रम काळे ठाणे जिल्हा यास उत्कृष्ट संरक्षक तर श्रीजित खरड अमरावती जिल्हा यास उत्कृष्ट आक्रमक यांना देण्यात आला.


 स्पर्धा यशस्वी करण्यात गोंदिया जिल्हा सचिव व आयोजक अनिल सहारे यांनी अथक परिश्रम घेतले. त्या सोबत महाराष्ट्र सचिव सुरेश गांधी व महाराष्ट्र सह सचिव राहुल अकुल यांचा सुद्धा मोलाचा हातभार लागला. पंच प्रमुख व वरीष्ठ पंच प्रवीण पोखरकरश्वेता खरातशुभम भगतआनंद जगदाळेशुभम देशपांडेनिस्सार सय्यदनेहा खंडेलवाल यांनी काम पाहिले.


या स्पर्धेत निवडलेला महाराष्ट्र संघ येत्या जानेवारीत जबलपूरमध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र चॉकबॉल संघटनेचे सह सचिव राहुल अकुल यांनी दिली. ठाणे जिल्ह्याच्या या कामगिरीवर खुश असल्याचे मत ठाणे जिल्हा प्रशिक्षक संदीप नरवाडे यांनी व्यक्त केले असून येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेले खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

Post a Comment

0 Comments