लिवप्युअर कडून उत्पादन पोर्टफोलिओत वाढ

३ नावीन्यपूर्ण, कमी खर्चिक ग्रॅव्हिटी वॉटर प्युरिफायर्स केले लॉन्च ~

मुंबई, १ डिसेंबर २०२१ : लिवप्युअर या वॉटर प्युरिफायर्स, एअर कंडिशनर्स आणि झोप व वेलनेस उपाययोजनांच्या आघाडीच्या उत्पादकाने अलीकडेच नवीन, अद्ययावत आणि तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांची श्रेणी बाजारात आणली आहे. ग्राहकांचे आयुष्य नावीन्यपूर्ण, तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांद्वारे सुलभ करून बदलण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार या ब्रँडने विविध वैशिष्टयांनी युक्त तीन नवीन वॉटर प्युरिफायर्स बाजारात आणले आहेत.


        लिवप्युअरने आपले नवसंशोधन एक पाऊल पुढे नेले आहे आणि नॅनो तंत्रज्ञान, नॉन इलेक्ट्रिक ऑपरेशन, रसायनमुक्त शुद्धीकरण, अल्ट्राफिल्टरेशन तंत्रज्ञान आणि ग्रॅव्हिटीवर आधारित प्युरिफिकेशन वॉटर प्युरिफायर्समध्ये प्रथमच आणले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातील उपकरणांच्या बाजारपेठेत क्रांती घडून येईल.


     लिवप्युअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रितेश तलवार म्हणाले की, "लिवप्युअर कायमच ग्राहकांना त्यांच्या आवश्यकतांच्या पूर्ततेसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त उपाययोजना देत आले आहे. ग्राहक आता मोठ्या कालावधीसाठी घरातच राहत असल्याने आमची विविध वैशिष्ट्यांनी युक्त नव्याने आणलेली वॉटर प्युरिफायर्स त्यांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचेपाणी मिळेल आणि त्यांच्या आयुष्याचा दर्जा सुधारेल, याची खात्री करतील. 


      आम्ही भारतातील स्वयंपाकघरातील उपकरण यंत्रणेत मोठे बदल घडवून आणण्यासाठी सज्ज आहोत आणि अशी नवनवीन उत्पादने लवकरच बाजारात आणणार आहोत."

Post a Comment

0 Comments