राज्यस्तरीय ऑनलाईन एकेरी नृत्य स्पर्धेत डोंबिवलीतील आर्या गजेंद्र गडकरला पहिले पारितोषिक

  


डोंबिवली ( शंकर जाधव ) सिनेरामा प्रॉडक्शन्स आयोजित "वामन अमृततुल्य चहा" पुरस्कृत "सूर्यवंशी" फेम अभिनेता आशिष वारंग आणि अभिनेता दिग्दर्शक राम माळी यांच्या हस्ते राज्यस्तरीय ऑनलाईन एकेरी नृत्य स्पर्धेत मोठ्या गटातून डोंबिवलीच्या आर्या गजेंद्रगडकर यांना प्रथम क्रमांकांच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  २३ डिसेंबर रोजी डोंबिवली बक्षीस वितरण समारंभ पार पडला.


 

       मोठ्या गटातून द्वितीय क्रमांक यवतमाळच्या मोहिनी हजारे आणि लहान गटातून प्रथम क्रमांक  यवतमाळच्या पलक नागोसे यांना संजू एंटरटेनमेंट च्या संजय लक्ष्मणराव यादव यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले.  अभिनेते अशीष वारंग यांच्या हस्ते कराडच्या ऐश्वर्या कदम यांना तृतीय क्रमांक तर जान्हवी एंटरप्राईजेसचे श्रीधर दिघोळे यांच्या हस्ते मोठ्या गटातून प्रथम उतेजनार्थ सूरज जाधव आणि घाटकोपरच्या मंगल माळी यांना द्वितीय उत्तेजनार्थ देण्यात आले.


 

          लहान गटातून श्री समर्थ एंटरटेनमेंटचे निर्माते अरुण बागडे यांच्या हस्ते प्रथम उतेजनार्थ तनिषा मोहिते आणि द्वितीय उतेजनार्थ दिव्या गायकवाड यांना  पुरस्कार देण्यात आला. अंजली दिघोळे यांच्या हस्ते लहान गटातील श्रुती रत्न्पारखे द्वितीय क्रमांकतर श्रेया रत्नपारखेस कार्तिक दिघोळे यांच्या हस्ते तृतीय क्रमांक देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर एकपात्री स्पर्धेतून शर्वरी काशिद आणि शिवाजी पाटील यांना अभिनेता राम माळी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.           या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सदानंद राणे आणि लेखक दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांनी काम पाहिलेतर कार्यक्रमाचे निवेदन दिग्दर्शक श्रीकांत मोरे यांनी केले. अभिनेता ज्ञानेश्वर मराठे सह अनेक मान्यवर कलाकार या कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी वामन अमृततुल्य चहाप्रकाश रेस्टॉरंटसंजू इंटरटेनमेंटश्री समर्थ एंटरटेनमेंट आणि जान्हवी एंटरप्राईजेचे प्रायोजक म्हणून सहकार्य लाभले आहे.

Post a Comment

0 Comments