प्लास्टिक विरोधात ठाणे महानगरपालिकेची कडक कारवाई ३०० किलो प्लास्टिक जप्त; २ लाख रुपयांचा महसूल जमा


ठाणे , प्रतिनिधी : स्वच्छ महाराष्ट्र मिशन यांचेकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार दिनांक १६ एप्रिल २०२१ पासुन ते दिनांक ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग स्तरावर प्रदूषण नियंत्रण विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग व समाज विकास विभाग यांच्या समन्वयाने प्लास्टिक वापरणाऱ्या १००० आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान एकूण ५० ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये ३०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून २ लाख १८ हजार ४०० रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे.


        दिनांक १६ एप्रिल २०२१ पासुन ते दिनांक ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रतिबंधीत प्लास्टिक साठवणूक, हाताळणी व विक्री करणाऱ्या १००० आस्थापनांवर एकूण ५० ठिकाणी कारवाई करण्यात आल्या आहेत.या कारवाईमध्ये जवळपास  ३०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तर संबंधित आस्थापनांना महिला बचत गटामार्फत तयार केलेल्या एकूण २१,८४० कापडी पिशव्यांचे वाटप करून कापडी पिशव्या विक्रीतून २,१८,४०० रुपयांचा महसुल जमा करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments