ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका घेऊ नयेत काँग्रेस ओबीसी सेल ची मागणी


भिवंडी : दि.21 (प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी असलेले राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने संपुष्टात आल्याने ओबीसी आरक्षणा शिवाय महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊ नयेत अशी मागणी भिवंडी काँग्रेस ओबीसी सेल चे शहराध्यक्ष अनंत पाटील यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे .


         भिवंडी शहर काँग्रेस ओबीसी सेलचे शहराध्यक्ष अनंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात पदाधिकारी आर्शि आजमी,अमीर खान,नसीम अन्सारी,
एकलाक अन्सारी,चांद बाबू शेख ,भगवान जाधव, सुरेश वाणी आदींचा समावेश होता त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या अनुपस्थित नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांना निवेदन सुपूर्द केले .


            सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजासाठी स्थानिक स्वराज्य संस्थे मधील आरक्षणा बाबत राज्य शासनाने काढलेले अध्यादेश सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्याने ओबीसी समाजाला कोणतीही निवडणूक लढवता येणार नसल्याने ओबीसी समाजावर अन्याय होत आहे.


            त्यामुळे त्या संबंधी समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे तरी शासनाने राज्य निवडणूक आयोगा कडून येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी समाजाच्या माहितीचा इंपिरिकल डाटा अद्यावत होत नाही तो पर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी केली आहे .


           ओबीसी समाजाचे 27 टक्के राजकीय आरक्षण केंद्र सरकारने इंपिरिकल डाटा उपलब्ध करून न दिल्याने गेले त्यास सर्वस्वी नरेंद्र मोदी व भाजपा जबाबदार असून भाजपाच्या नाकर्ते पणा मुळे गेल असून त्यामुळे ओबीसी समाजाचा व्यक्ती साधा ग्रामपंचायत सदस्य सूध्दा होऊ शकत नाही भविष्यात शैक्षणिक आरक्षण संपविण्याचे  महापाप भाजप करेल त्यामुळे आरक्षण टिकविण्यासाठी  काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून केंद्र सरकार विरोधात तीव्र आंदोलन करतील असा इशारा शेवटी अनंता पाटील यांनी दिला आहे .

Post a Comment

0 Comments