कल्याणच्या लहान मुलांनी सर केला कठीण मलंगगड

 


कल्याण, प्रतिनिधी  : कल्याणच्या ३ लहान मुलांनी कठीण समजला जाणारा मलंगगड दोरखंडाने पार केला आहे. कुठेही घाबरून न जाता ३ मुले गडावर गेले. ओम ढाकणे (वय ४)परिणीती लिंगे(वर्षं ७) आणि अवंती गायकवाड(वय ७) असे या तीन मुलांचे नाव असून कठीण समजला जाणारा मलंगगड दोरखंडाने पार केला आहे. सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या गिर्यारोहण संघाच्या मार्गदर्शनानुसार गड पार केला.


      मलंगगड सर करतांना साहसाची आणि मनाची शक्ती असणे गरजेचे आहे. दोन कातळकडे केवळ एक लोखंडी पाइपला बांधून असल्याने त्यांवर चालून मलंगगड सर करता येतो असे भुषण पवार यांनी सांगितले. सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरच्या पवन घुगे, अक्षय जमदरे, दर्शन देशमुखरणजित भोसले यांनी मुलांना गड चढण्यासाठी सहकार्य केले.


            मलंगगड म्हणजे माथेरानच्या डोंगररांगे मध्ये वसलेला गड. समुद्रसपाटीपासून मलंगगडाची उंची तीन हजार दोनशे फूट उंच आहे. विशेष म्हणजे किल्ल्याच्या वर गेले की जीर्ण झालेला वाडा दिसतो तसेच पाण्याच्या टाक्या सुद्धा उपलब्ध आहे. इतिहास काळात किल्ल्याचा वापर हा कल्याणभिवंडी बदलापूर अश्या जवळच्या शहरांवर लक्ष देण्यासाठी बनवला गेला असावा अशी रचना आहे. कल्याणच्या दक्षिणेपासून अवघ्या सोळा किलोमीटवर हा  गड आहे. 


         पनवेल वावंजे गावपासून हा किल्ला दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे. बदलापूरच्या नैर्ऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे. करंजा,उरण नैर्ऋत्येस आणि बोरघाटभीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा किल्ला होता.

Post a Comment

0 Comments