पश्चिमेतील रेतीबंदर रस्त्याचा कायापालट होणार पुन र्बांधणी साठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर


डोंबिवली ( शंकर जाधव ) विकास कामांसाठी जोपर्यंत निधीची व्यवस्था होत नाही तोपर्यंत भूमीपूजनाचा घाट घालत नाही.नेहमी रहदारीचा आणि भविष्यात वाहतूक कोंडीतून मोकळीक देणारा रस्ता असावा यासाठी रेतीबंदर रस्त्याच्या पुनर्बांधणीची गरज होती. त्यामुळेच``प्रभाग कार्यालय ते मोठागांव मानकोली उड्डाणपूल या रस्त्याची पुनर्बांधणी होणार आहे.सदर पुनर्बाधणी कामासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने  कोटी निधी मंजूर  केला असून बुधवारी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पालिकेचे माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते झाले. 

 


    डोंबिवली पश्चिमेतील `` प्रभाग कार्यालय ते मोठागांव मानकोली उड्डाणपूल हा रस्ता वाहतुकीच्या आणि रहदारीच्या दृष्टीने महत्वाचा रस्ता आहे. २०१४  साली रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यानंतर पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था झाली होती. तसेच रस्त्याच्या खालील जलवाहिनीमल निस्सारण वाहिनीचे काम झाले होते. यामुळेही रस्ता खराब झाला होता. या भागात आठवडी बाजार प्रमाणेच रविवारबुधवार आणि शुक्रवार या दिवशी बाजार भरतो. यावेळी मासळीबाजारही असल्याने वाहतूक कोंडी होत असते. ठाकुर्ली उडाणपूल मार्गे नवापाडाउमेशनगरमोठागांवजुनी डोंबिवली विभागात धावणारी वाहने याच रस्त्यावरून ये-जा करीत असल्याने रेतीबंदर रस्त्याची पुनर्बाधणी करण्यात यावी यासाठी स्थायी समितीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे हे सतत पाठपुरावा करीत होते.स्थायी समिती सभापती असताना त्यांनी या रस्त्यासाठी निधीची तरतूद देखील करून ठेवली होती.सदर कामास कल्याण डोंबिवली महापालिका बांधकाम विभागाने मंजुरी दिली असून  कोटीचा निधी ही मंजूर केला आहे.

Post a Comment

0 Comments