अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत एसटी महाविद्यालयाच्या महिला खेळाडूंचे वर्चस्व


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत एसटी महाविद्यालयाच्या तीन महिला खेळाडूंनी आपले वर्चस्व गाजवले.


या कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत जाधव भगिनींनी सुवर्णपदक पटकावत मुंबई विद्यापीठात आपले नाव कोरले. मनाली जाधव ६५ किलो वजनी गटात आणि प्राजक्ता पानसरे हिने ५५ किलो वजनी गटात सलग चौथ्या वेळा मुंबई विद्यापीठात सुवर्णपदक पटकावत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान पटकावला.  तसेच गौरी जाधव ६२ किलो वजनी गटात हिने सुद्धा प्रथमच या स्पर्धेत सहभाग नोंदवत सुवर्णपदक पटकावले. या तिन्ही खेळाडू हरयाणा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.


मनाली जाधव हिने २०१९-२० ला मुंबई विद्यापीठाला प्रथमच अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर महिला कुस्ती मध्ये कांस्य पदक दिले होते. महिलांमध्ये निकिता गायकवाड़ आणि पुरुषामध्ये मध्ये हृषिकेश पवार यांनी सुद्धा अंतिम फेरीत प्रयत्ननाची पराकाष्ठा केली पण त्यांना या निवड प्रकियेसाठी मुक़ावे लागले आणि त्यांना द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. ही स्पर्धा यशस्वी पणे पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पंच व रायगड जिल्हा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे क्रीड़ा संचालक डॉ. मोहन आमृले यांनी सर्व खेळाडुंचे अभिनंदन केले.


एसएसटी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी,  उपप्राचार्या डॉ. खुशबू पुरस्वानीउपप्राचार्य जीवन विचारे तसेच क्रीड़ा शिक्षक राहुल अकुल पुष्कर पवार या सर्वांनी सुद्धा विजेत्या खेळाडुंचे अभिनंदन केले आणि पुढील  वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments