खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत 'फ्री हीट दणका' मराठी चित्रपटाचे प्रकाशन

■आर.पी.आय. जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनवणे यांचे आयोजन...


कल्याण , प्रतिनिधी : ऐतिहासिक कल्याण नगरीत कला क्षेत्रात अनेक हिरे दडले आहेत. याच कल्याण नगरीतील युवकांनी निर्मिती केलेल्या 'फ्रि हीट दणका या मराठी चित्रपटाचा प्रकाशन सोहळा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल कशिष इंटरनॅशनल येथे मोठ्या दणक्यात पार पडला.


फॅन्ड्री फेम सोमनाथ अवघडे उर्फ झब्या याची मध्यवर्ती भूमिका असलेल्या आणि सैराट फेम  सल्या याची भूमिका असलेल्या ‘फ्रि हिट दणकाया चित्रपटाचे निर्माते आकाश ठोंबरेमेघनाथ सोरखडेसुनील मगरेअभिनेत्री अपूर्वा शेलगावकर आदी कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या चित्रपट प्रकाशन सोहळ्यासमयी व्यासपिठावर नगरसेवक महेश गायकवाडनवीन गवळीदलित मित्र अण्णा रोकडे समाजसेवक देवचंद अंबादेउद्योगपती मिलिंद बेळमकर आदी मान्यवर उपस्थित होते.


 एस.जी.एम. फिल्म प्रस्तुत 'फ्रि हीट दणकाहा चित्रपट येत्या १७ डिसेंबर रोजी नजीकच्या चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे. या सोहळ्या समयी उपस्थितांना संबोधीत करतांना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले कीकल्याण मधीलच युवकांनी सिने क्षेत्रात प्रवेश करून चित्रपट निर्मिती केली आहे हि  कल्याणकरांसाठी भूषणावह बाब आहे. कोरोना काळात संकटात सापडलेली सिने सृष्टी आणि कलाकारांवर कोसळलेले आर्थिक संकट या बिकट परिस्थितीतही हा चित्रपट पूर्ण होवून रसिकांसाठी पडद्यावर येत आहे. या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट सिनेमागृहात जावून पाहिला पाहिजे असेली ते म्हणाले.


आर.पी.आय. (आठवले) कल्याण डोंबिवली शहर जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनवणे यांच्या प्रमुख आयोजनाने आयोजित करण्यात आलेल्या या चित्रपट प्रकाशन सोहळ्यास शेखर केदारेसुबोध भारतमहादेव रायभोळेअशोक भोसलेकेतन रोकडेप्रकाश कांबळे आदी मान्यवर आणि सिनेरसिक मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments