काँग्रेसच्या प्रयत्नाना यश.. कल्याण-शिळ रस्त्यावरील धोकादायक ठिकाणी टाकले बॅरिगेड्स


डोंबिवली  ( शंकर जाधव ) कल्याण शीळ रोडवर एमएमआरडी कडून रस्त्याचे काम सूरु आहे.मात्र सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिगेड्स टाकले नसल्याने एका ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली होती.काँग्रेस पदाधिकारी शिबु शेख आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ या ठिकाणी जाऊन परिस्थिती पहिली.या ठिकाणी बॅरिगेड्स न टाकल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता असून संबंधीत ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शेख यांनी केली होती.काँग्रेसच्या प्रयत्नाला यश अलेअसूं 
कल्याण-शिळ मार्गावरील सोनारपाड्यासमोर असलेल्या धोकादायक ठिकाणी बॅरिगेड्स टाकण्यात आले आहेत.
       

              कल्याण-शिळ मार्गावरील सोनारपाड्या समोर एमएमआरडीमार्फत सुरु असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान तेथे बॅरीगेट लावले नसल्याने मंगळवारी पहाटे  ४ वाजण्याच्या सुमारास एका ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.अपघातस्थळी सोनिया गांधी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तथा कल्याण-डोंबिवली कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष शिबू शेख यांनी धाव घेऊन कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मदतीने ट्रक रस्त्याच्या एका बाजूला नेऊन पार्क केला. 


            काँग्रेस पदाधिकारी शिबू शेख यांच्या प्रतिक्रियेची गांभीर्याने दखल घेऊन एमएमआरडीए प्रशासनाने घेतली. तर या पक्षाचे अन्य पदाधिकारी लवेश कुबल यांनी व्हिडिओद्वारे अर्धवट राहिलेल्या रोडच्या कामचे वास्तव सोशल मीडियामार्फत चव्हाट्यावर आणले. या सर्व घटनाक्रमानंतर सदर कामाच्या ठेकेदाराने अर्धवट राहिलेल्या रस्त्याच्या चारही बाजूंनी पट्टी बांधून, तसेच कपडा लावून काम करून दिले. जेणेकरून सदर काम पूर्ण होईपर्यंत कोणताही अपघात होणार नाही. 

Post a Comment

0 Comments