ग्रामीण भागातील पाणी पुरवठा, स्वच्छता प्रकल्पां तील ४ कोटींच्या कामांना मंजुरी

■लवकरच कामांना सुरूवात होणारतर सुमारे ५६ कोटींची कामे डीपीआर स्तरावर खासदार डॉ.  श्रीकांत  शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश पाणी पुरवठा,  नळ पाणी योजनाघनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प मार्गी लागणार...


कल्याण, प्रतिनिधी  : ग्रामीण भागातील पाणी पुरवठास्वच्छता प्रकल्पांतील ४ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच या कामांना सुरूवात होणार आहे.  तर सुमारे ५६ कोटींची कामे डीपीआर स्तरावर असून  खासदार डॉ.  श्रीकांत  शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे पाणी पुरवठा,  नळ पाणी योजनाघनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प मार्गी लागणार आहेत.


ठाणे जिल्ह्यातील  कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागाचाही शहराच्या धर्तीवर  विकास  होतो आहे. त्यामुळे शहरांच्या धर्तीवर या ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे यांनी ग्रामीण भागातील पाणी  पुरवठा,  सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांसाठी जिल्हा परिषदेकडे निधीची मागणी केली होती. 


 त्यानुसार कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील सुमारे ४ कोटी १९ लाखांच्या कामांना मजुरी मिळाली असून निविदा स्तरावर असलेल्या या कामांना लवकरच  सुरूवात होणार आहे. यात ३ कोटी ५ लाख  रूपयांची कामे सांडपाणी व्यवस्थापनशी संबंधित आहेत. तर घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित ४४ लाखांच्या  कामाचा  यात समावेश आहे. सुमारे ५६ कोटी ९ लाखांची कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जातो आहे.


कल्याण लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाचा शहरांच्या धर्तीवर विकास  होत असला तरी सध्या तरी या भागात शहराच्या धर्तीवर पायाभूत सुविधा या भागात उभारल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात पाणी पुरवठासांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प उभारण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.  श्रीकांत शिंदे  प्रयत्नशील होते. 


त्यासाठी  त्यांनी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पाताई गणेश पाटीलभाऊसाहेब दांगडेमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची भेट घेत पाठपुरावा केला असता अध्यक्षा पुष्पा पाटील आणि सीईओ भाऊसाहेब दांगडे यांचेकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आली. व यातील बहुतांशी कामे सध्या निविदा स्तरावर असून उर्वरित प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आले आहेत. लवकरच या प्रकल्पांनाही गती मिळणार आहे.


या  कामांमध्ये कल्याण तालुक्यातील म्हारळवरप आणि  कांबा  या ग्रामपंचायतीत सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्पाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. सध्याच्या घडीला ४ कोटी १९ लाख २६ हजारांच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात घनकचरा व्यवस्थापनातील ४४ लाख ७८ हजार रूपयांच्या तर सांडपाणी व्यवस्थापनाशी संबंधित ३ कोटी ५ लाख ५७ हजार रूपयांच्या कामांचा समावेश आहे. 


तर सुमारे ५४ कोटी ७२ लाख ७ हजार रूपयांची विविध कामांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आले आहेत. यात कल्याण तालुक्यातील नारिवलीखोणीवडवलीनागावदहिसरपिंपरीवाकळण तालुक्यातील प्रकल्पांचे  सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 


Post a Comment

0 Comments