एअर्थच्या एअर प्युरिफायरची यशस्वी चाचणी

■व्हीशुअर अॅण्टीमायक्रोबियल प्युरिफायर९९.९ टक्के काळ्या बुरशीचे निर्मूलन करते ~


मुंबई, २२ डिसेंबर २०२१ : एअर्थने २०२० मध्ये आपल्या कार्यसंचालनांना सुरूवात केल्यापासून त्यांची उत्पादने व अभूतपूर्व दृष्टिकोनाने जगभरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जगातील प्रथम त्यांच्या अॅण्टीमायक्रोबियल एअर प्युरिफायर्सची कार्यक्षमता व परिणामकारकता तपासण्यासाठी विविध स्तरांवर चाचणी करण्यात आली आहे, ज्याबाबत कंपनी हमी देते. 


    नुकतेच प्रतिष्ठित सीएसआयआर- आयएमटेक (सीएसआयआर – इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबियल टेक्‍नोलॉजी) प्रयोगशाळेने काळ्या बुरशीचे निर्मूलन करण्यासंदर्भात एअर्थच्या व्हीशुअर अॅण्टीमायक्रोबियल एअर प्युरिफायरच्या परिणामकारकतेची चाचणी केली आणि निष्कर्ष काढला की, या उत्पादनाने बुरशीच्या प्रजाती (म्यूकोर हायमालिस व रायझोपस ओरिझा) होण्यास कारणीभूत ठरणा-या काळ्या बुरशीचे ९९.९ टक्के निर्मूलन केले. या उल्लेखनीय घोषणेमुळे एअर्थचे प्युरिफायर्स अग्रस्थानी पोहोचण्यासोबत उत्पादनांच्या भावी श्रेणीसाठी आणखी एका संरक्षण प्रमाणनाची भर होते.


     एअर्थचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कौशिक म्हणाले, "हवेतील विषाणू व बुरशीने आपल्याला अनेक पिढ्यांपासून त्रास दिला आहे, ज्यामुळे आमचा त्यांच्यावर परिपूर्ण नियंत्रण ठेवू शकतील, अशी उत्पादने निर्माण करण्याचा प्रयत्न होता. मागील वर्षांपासून आम्ही ग्राहकांना प्युरिफायरची विक्री करण्यापूर्वी त्यांच्या अनेक चाचण्या करत अचूकतेची तपासणी केली आहे. आयआयटी बॉम्बे व आयआयटी कानपूरचे प्रतिनिधित्व करण्यासोबत तंत्रज्ञान-संचालित व आरअॅण्डडी-संचालित स्टार्टअप असलेलो आम्ही बारकाईने आमचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.


      सीएसआयआर-एनएबीएल प्रयोगशाळेकडून (भारत सरकारची प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रयोगशाळा) सत्यापन मिळाल्यानंतर नुकतेच सीएसआयआर-आयएमटेक प्रयोगशाळेकडून मिळालेले चाचणी सत्यापन आमच्या बेंचमार्क्‍सच्या शिरपेच्यात आणखी एका तु-याची भर आहे. आतापर्यंत कोणत्याच प्युरिफायर कंपनीला अशी कामगिरी करता आलेली नाही. आमचा बहु-कार्यक्षम प्युरिफायर हवेतील दूषक व बुरशींचे निर्मूलन करण्यासाठी हॉस्पिटल्‍स, घरे व कार्यालयांमध्ये इन्स्टॉल करता येऊ शकतो, ज्यामुळे भारतीयांना सुरक्षितपणे श्वास घेता येण्याची खात्री मिळेल."


         भारतामध्ये काळी बुरशीच्या केसेस कमी झाल्या असल्या तरी त्याचा धोका फक्त कोविड-१९ पुरताच मर्यादित नाही. ही कधीच न संपणारी समस्या आहे. हा आजार मधुमेह (विशेषत: अनियंत्रित मधुमेह), दीर्घकाळापर्यंत स्टेरॉईड्सचा वापर, कमकुवत रोगप्रतिकारशक्ती, आयसीयूमध्ये दीर्घकाळापर्यंत राहणे अशाघटकांमुळे देखील होऊ शकतो. हा घातक संसर्ग होण्याच्या भितीसह राहण्याऐवजी घरामध्ये एअर्थ प्युरिफायर आणणे सर्वोत्तम आहे. हवेतील घातक दूषकांचे निर्मूलन करण्यासोबत व्हीशुअर अॅण्टीमायक्रोबियल एअर प्युरिफायर यशस्वीरित्या ९९.९ टक्के काळ्या बुरशीचे निर्मूलन करेल आणि तुम्हाला श्वासोच्छ्वासासाठी शुद्ध व सुरक्षित हवा मिळेल.

Post a Comment

0 Comments