सुद्रुढ वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने केंद्र सरकारच्या विविध योजना नोंदणी ..डोंबिवली ( शंकर जाधव ) सुद्रुढ वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने केंद्र सरकारच्या विविध योजनांची नोंदणी वंदना सोनावणे यांच्या पुढाकाराने डोंबिवली पूर्वेकडील देशमुख होम्स येथील  न्यू लॉर्ड इंग्लिश स्कुल मध्ये करण्यात आली.          यात इ –श्रमिक कार्ड , हेल्थ कार्ड, सर्व प्रकारच्या कामगार, घरकाम, सफाई काम व इतर कामांसाठीअ आवश्यक कार्ड, विधवा पेन्शन कार्ड,बंद केसरी रेशन कार्ड अश्या अनेक योजनांची नोंदणी व मतदार नोंदणी झाल्या.       यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी यावर उत्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी सोनावणे म्हणाल्या, नागरिकांना सरकारी योजनांची माहिती आणि लाभ मिळणे आवश्यक आहे. यासाठी अश्या प्रकारचे शिबीर भरविले पाहिजे.

Post a Comment

0 Comments