आदर्श स्विट मार्टमधील प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त.. पालिके रुपये ५ हजार दंड वसूल

■प्रतिबंधित प्लॉस्टिक पिशव्या जप्त करण्याची धडक कारवाई.

 
डोंबिवली ( शंकर जाधव )  प्लॉस्टिक पिशव्यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी  पालिकेच्या  घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून प्रतिबंधित प्लॉस्टिक निर्मूलनाची कारवाई केली जाते. डोंबिवली पूर्वेकडील  'फ' प्रभागाचे सहा. आयुक्त किशोर शेळके यांनी प्रभागातील प्रमुख आरोग्य निरिक्षक व आरोग्य निरिक्षक यांचे समवेत  पूर्व येथील रेल्वे स्थानक परिसरात  प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्तीची धडक कारवाई केली. 


         या कारवाईत एकुण ५ किलो पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्याचप्रमाणे आदर्श स्विट मार्ट यांचेकडील प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करुन त्यांचेकडून रुपये ५ हजार दंड आकारण्यात आला.महाराष्ट्र शासनाने मार्च, 2018 पासून एकल वापर प्लॉस्टिक पिशव्यांवर व थर्माकोलवर बंदी घातलेली असून विक्रेता अथवा ग्राहक यांचेकडे प्लॉस्टिक पिशव्या आढळून आल्यास पहिला गुन्हा रुपये 5 हजार दंड, दुसरा गुन्हा रुपये 10 हजार दंड अशा तरतूदी प्लॉस्टिक व थर्माकॉल बंदी अधिनियम 2018 मध्ये अंतर्भूत आहेत. 

Post a Comment

0 Comments