भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश सहसंयोजक पदी सुभाष राठोड यांची निवड

■प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते दिले नियुक्ती पत्र

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :- भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी सुभाष राठोड यांची निवड केली. पक्ष वाढीच्या दृष्टीने सुभाष राठोड यांच्या कामाची दखल घेत प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी नुकतेच नियुक्तीपत्र देऊन राठोड शुभेच्छा दिल्या.


          अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व बंजारा समाजाचे नेते म्हणून सुभाष राठोड यांची ओळख आहे.येणाऱ्या काळामध्ये पक्षाची ध्येयधोरणे व अंत्योदय घटकांच्या कल्याणाचा विचार घेऊन सक्रियपणे काम करण्यासोबतच संघटन वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. भटके विमुक्त समाजाला संघटित करण्याची खरी गरज आहे, त्यांचे अनेक प्रश्न आहे, जे शासनाकडून आत्तापर्यंत दुर्लक्षित राहीले.


           येणाऱ्या काळामध्ये त्या सर्व भटक्या समाजाला न्याय देण्यासाठी काम करण्याची अपेक्षा माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले.यावेळी छाया राठोड, एकनाथ राठोड, रमेश राठोड ,गणपत राठोड, राज कुमार मडगु, गोपाल चव्हाण आदी नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments