मध्य प्रदेश मॅरेथॉनमध्ये एस.एस.टी. कॉलेजचा डंका

   


कल्याण, प्रतिनिधी  : मध्य प्रदेश येथे झालेल्या सतना मैराथॉन स्पर्धेत एस.एस.टी महाविद्यालय उल्हासनगर येथील खेळाडुंनी आपला सहभाग नोंदवला होता.  यात १० किलोमीटर स्पर्धेत ३२:२८  मिनिटे वेळ देत ओमकार बैकर याने प्रथम स्थान पटकावला.  तसेच सिद्धेश बरजे याने ३३:००  मिनिट वेळ देत तिसरे स्थान पटकावले. तसेच मुलींमध्ये योगिता तांबटकर हिने चतुर्थ स्थान पटकावले. २१ किलोमीटर हाफ मैराथॉन स्पर्धेत प्रियंका पाईकराव हिने चतुर्थ स्थान पटकावले. विजेत्या सर्व खेळाडूंना ट्रॉफी आणि रोख देऊन गौरविणयात आले.


या यशामुळे खेळाडुंचे चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. एस.एस.टी. महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानीउपप्राचार्य जीवन विचारे तसेच क्रीड़ा शिक्षक राहुल अकुलपुष्कर पवार आणि मार्गदर्शक संदेश चव्हाण या सर्वांनी विजेत्या खेळाडुंचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालिसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. 

Post a Comment

0 Comments