डार्क फॅन्टसी डेझर्ट्सच्या लाँचसह सनफीस्टने सेंटर - फिल्ड कुकीज आणल्या नव्या स्वरुपात

■मिष्टान्नाचा अनुभव वृद्धिंगत करण्यासाठी खास तयार केलेले चोको चंक्स आणि चोको नट डिप्ड केले सादर..


नॅशनल, २७डिसेंबर २०२१ : ITC लि.च्या सनफीस्ट डार्क फॅन्टसी या भारतातील एका प्रीमिअम कुकी ब्रँडतर्फे डार्क फॅन्टसी डेझर्ट्सच्या लाँचची घोषणा करण्यात आली. यात चोक चंक्स आणि चोको नट डिप्ड या दोन रुचकर व तोंडाला पाणी आणणाऱ्या सेंटर फिल्ड कुकींचे कलेक्शन आहे. या लाँचसह डार्क फॅन्टसीच्या चोको फिल्स या फ्लॅगशिप ब्रँडच्या मूळ अनुभवाला वृद्धिंगत करण्याचे ब्रँडचे उद्दिष्ट आहे.


            ही डेझर्ट-इन-अ-कुकी रेंज ग्राहकांना आपल्या दिवसाची सांगता खास फॅन्टसी मार्गाने म्हणजेच ‘दिन खतम फॅन्टसी शुरू' या ब्रँडच्या मध्यवर्ती विचाराने करण्याचे अजून एक कारण मिळाले आहे.


             नव्या युगातील ग्राहकांसाठी सोबत बाळगण्याची व कधीही खाता येण्याजोगी डेझर्ट्स म्हणून प्रस्थापित करण्यासाठी डार्क फॅन्टसी डेझर्ट्सचा प्रयत्न असतो. उत्तम खाद्यानुभव देण्यासोबतच बाजारात उपलब्ध असलेल्या चोको कुकींच्या अनुभवाची पातळी उंचावण्याचा ते प्रयत्न करत आहेत.


         डार्क फॅन्टसी डेझर्ट कलेक्शनमध्ये दोन आकर्षक पदार्थांच्या मेजवानीचा समावेश आहे:


१. चोको चंक्स: कुरकुरीत क्रस्टमध्ये स्वादिष्ट चोको चिप्स भरलेली ही रुचचक कुकी असून त्यात सढळ हस्ते रिच सिल्कन मोल्टन चॉकलेट क्रीम भरले आहे. हे खाल्ल्यावर परिपूर्ण आणि विविध पोत असलेला चोको अनुभव मिळतो. ४ कुकी असलेला ७५ ग्रॅ.चा पॅक बॉक्समध्ये मिळतो आणि त्याची किंमत रु.५० आहे.


        २. चोको नट डिप्ड: चोको आणि हेझलनट भरलेल्या कुकी ज्याचा क्रस्ट काजू व बदामांचा आहे. सिल्की स्मूथ चॉकलेटचे आवरण असलेल्या या कुकी अत्यंत आनंददायक आणि प्रीमिअम चोको अनुभव देतात. ६ कुकींचा १०० ग्रॅ.चा पॅक बॉक्समध्ये मिळतो आणि त्याची किंमत रु.५० आहे.


         डार्क फॅन्टसी डेझर्ट्सच्या लाँचबद्दल ITC लिमिटेडच्या फुड्स डिव्हिजनच्या बिस्किट्स आणि केक क्लस्टरचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. अलि हॅरिस शेरे म्हणाले, “डार्क फॅन्टसी आपल्या आकर्षक चोको क्रिएशन्ससाठी पसंत केले जाते. ब्रँडच्या उपभोगाचे प्रसंग विस्तारण्यासाठी आम्ही सतत करत असलेले प्रयत्न ही डार्क फॅन्टसी डेझर्ट्सच्या लाँचमागची कल्पना आहे. भारत हा गोडखाऊंचा देश म्हणून ओळखला जातो.


          या नव्या सादरीकरणासह आम्ही ग्राहकांना खास व आकर्षक डेझर्टचा अनुभव देऊ करत आहोत. नव्या भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडींशी सुसंगत राहत हे नवे मिष्टान्न ब्रँडसाठी एख नवे रोमांच आणि उंचावलेले अपील घेऊन आले आहे. या लाँचमुळे सनफीस्टसाठी डेझर्ट या नव्या सेगमेंटची कवाडे खुली होतील आणि कुकींच्या क्षेत्रात आमच्यासाठी अधिक रोचक संधी निर्माण होतील, असा आम्हाला विश्वास आहे.


          डार्क फॅन्टसी डेझर्ट्स दक्षिण व पश्चिम विभागातील आणि दिल्ली व कोलकातासारख्या महानगरांमधील किरकोळ दुकानांमध्ये आणि निवडक आधुनिक ट्रेड स्टोअर्समध्ये तसेच www.itcstore.in या ITCच्या डायरेक्ट-टू-कन्झ्युमर चॅनलमध्ये उपलब्ध असतील. ब्रँडच्या प्रीमिअम ऑफरिंग सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी डार्क फॅन्टसी डेझर्ट्सच्या लाँचला सर्वांगीण कम्युनिकेशन कॅम्पेनचे सहाय्य मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments