मुंबई विद्यापीठ योगा टीममध्ये एसएसटी महाविद्यालयाच्या खेळाडुंची निवड


कल्याण, प्रतिनिधी  : मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ योगा निवड चाचणी स्पर्धा ही बिर्ला महाविद्यालय कल्याण येथे पार पडली. यात एसएसटी महाविद्यालय उल्हासनगरचे प्रदीप बिरादर आणि विकास तरे दोन्ही खेळाडू  25 ते 29 डिसेंबर या दरम्यान भुवनेश्वर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.


कोविड मुळे मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन स्पर्धा या वर्षात रद्द करण्यात आल्या आणि निवड चाचणी द्वारे आंतर विद्यापीठ स्पर्धासाठी खेळाडुंची निवड करण्यात आली. अत्यंत अतितटीच्या निवड चाचणीत दोन्ही खेळाडूंनी आपले कौशल्या पणाला लावले होते.


मुंबई विद्यापीठाचे क्रीड़ा संचालक डॉ. मोहन आमृले यांनी यांचे अभिनंदन केले. तसेच एसएसटी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानीउपप्राचार्या डॉ. खुशबू पुरस्वानीउपप्राचार्य जीवन विचारे तसेच क्रीड़ा शिक्षक राहुल अकुल, पुष्कर पवारमहाविद्यालयाचे मार्गदर्शक श्रीकांत शेलार आणि आकाश राजपूत यां सर्वांनी सुद्धा विजेत्या खेळाडुंचे अभिनंदन केले आणि भुवनेश्वर येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments