सोशल मिडियावर बदनामी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांची मागणी

                                               


                            

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :-    कल्याण डोंबिवली २७ गावातील आडीवली ढोकळीचे माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी  २७ गावातील रजिस्ट्रेशन बंद असल्याने २७ गावातील बांधकाम व्यावसायिक  यांना सोबत घेऊन  काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष  नानाभाऊ पटोले यांना पत्र दिले होते. आणि या प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंती केलीं होती.


      यासंदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरत यांनी लक्ष देत महसूल उत्पन्न वाढले यावर मार्ग काढण्यासंदर्भात पाठ पुरावा केला. पण  काही समाज कंटकांनी सोशल मीडियावर त्यांची बदनामी सुरू केल्याने  मानपाडा पोलीस स्थानकात सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्याबाबत   अर्ज दिला  आहे.          तसेंच काही दीवसापूर्वी २७ गावातील रजिस्ट्रेशन  टोकन  पद्धतीने  चालू असल्याच्या  तक्रारी नागरिकांनी आपल्याकडे केल्या होत्या टोकन पद्धतीने दीड  ते दोन लाख रुपये रक्कम आकारली  जात होती .ह्या प्रश्नाला आपण वाचा फोडल्यामुळे माझी व  नाना पटोळे  यांची सोशल मीडियावर लिखाण  मेसेज करून काही समाज कंटकांनी  बदनामी सुरू केली आहे.


        त्यामुळे मी मानपाडा पोलीस, ठाणे पोलिस आयुक्त यांना पत्र देऊन संबंधितावर कारवाई करावी व त्यांना शिक्षा करावी अशी मागणी नगरसेवक कुणाल पाटील यांनी केली आहे. जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर आपण पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करु असा इशारा त्यांनी एका पत्रकार पतिषदेत केला आहे.

Post a Comment

0 Comments