कळवा परिसरात चोऱ्या करणारा 'अट्टल चोरास'कळवा पोलिसांनी केली अटक,


कळवा , अशोक घाग  :  कळवा परिसरात गेल्या काही दिवसांपासून जबरी चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते.या चोरांवर अंकुश ठेवण्यासाठी कळवा पोलिसांच्या वतीने उपाययोजना आखल्या होत्या. त्यानुसार कळवा सह्याद्री शाळेजवळ कावेरी सेतू परिसरात कळवा पोलिसांनी सापळा रचून आरोपी शंकर राजकुमार प्रताप उर्फ कांबळे(20) राहणार मफतलाल झोपडपट्टी कळवा (पूर्व)याला 12 डिसेंबरला अटक केली तर त्याचा साथीदार हिप्पो उर्फ गणेश दुचाकीवर पळून गेला आहे.
  

       आरोपी शंकर आपला साथीदार हिप्पो उर्फ गणेश याच्या मदतीने कळवा परिसरात चोऱ्या करीत होता.त्यानुसार त्यावर कळवा पोलिसांनी पाळत ठेवली होती.त्यानुसार अप्पर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे व कळवा विभाग सहा.पो.आयुक्त व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कळवा पोलीस वरिष्ठ निरीक्षक मनोहर आव्हाड पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर पो.निरीक्षक महेश कवळे यांनी स्वतंत्र पथक तयार करून सोबत मंगेश महाजन प्रदीप शिंदे गणेश रामराजे संदीप महाडिक सुनील गुरव शिवाजी कंकणे यांनी आरोपी ला अटक केली आहे.आरोपीवर तीन गुन्हे दाखल असून त्याच्या कडून 1 लाख 38 हजार रुपये जप्त करण्यात आले असल्याची माहिती कळवा पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.

Post a Comment

0 Comments