सकल मराठ फाऊंडेशन प्रणित ( भारतीय मराठा संघ ) च्या किल्ले व रांगोळी स्पर्धेचा पारि तोषिक वितरण


डोंबिवली , प्रतिनिधी : सकल मराठा फाऊंडेशन प्रणित (भारतीय मराठा संघ )  संस्थापकअध्यक्ष अविनाश  पवार  व सरचिटणीस राजेंद्र  पालांडे  यांच्या मार्गदर्शनाखाली  भव्य किल्ले व रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. स्पर्धेत २० किल्ले तसेच १५० हुन अधिक रांगोळी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.  त्यातील २० पारितोषिक हे किल्ले विभागाला तसेच२०  पारितोषिक हे रांगोळी विभागाला असे एकूण ४० पारितोषिक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र स्वरूपात देण्यात आले. तसेच यावेळी सुहासिनी चव्हाण यांची कल्याण विभाग संघटिकापदी नवीन नियुक्ती करण्यात आली.      पारितोषिक वितरण समारंभास भारतीय मराठा संघाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पवार,प्रदेश सरचिटणीस राजेंद्र पालांडेखजिनदार अजित जाधव,माजी नगरसेवक महेश गायकवाड,तलाठी संघटना कार्याध्यक्ष सुभाष ढोणे,प्रदेश उपाध्यक्ष दिपक पालांडे,प्रदेश सचिव महेश महापदी,प्रदेश उपाध्यक्ष आनंदा संकपाळ,प्रदेश उपाध्यक्षा संपदा ब्रीद,शिवसेना उपशहर संघटक .रीना ढोणे,शिवसह्याद्री प्रतिष्ठान जिल्हाध्यक्षा  स्वाती मुळीक,युवासेना उपजिल्हा अधिकारी भुषण यशवंतरावयुवासेना उपशहर अधिकारी शेखर पिसाळराहुल खंदारे आदि मान्यवर उपस्थित होते.       सदर कार्यक्रमाचे नियोजन भारतीय मराठा संघ कल्याण जिल्ह्याच्या वतीने ठाणे/पालघर जिल्हा संपर्कप्रमुख विनोद जाधव,ठाणे युवा जिल्हा अध्यक्ष सागर सुनिल वाळवेकल्याण जिल्हाध्यक्ष सागर पाटील,युवा जिल्हाध्यक्ष मयुर डोंगरे, गणेश मोरे,सीताराम कोकणे,सुदेश ब्रीद,प्रणाली ब्रीद,प्रियांका मोरे,अर्पिता जाधव,पूनम बेले,करण्यात आले होते,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर वाळवे यांनी केले.

  

 

चौकट


 रांगोळी स्पर्धेचे निकाल


१)सानिका पाटील ( करोना डोंगर )

२)संजना पाटील  ( रंपबद्दल संदेश )

३) वृदांवन जाधव (स्वच्छता )

४)साई डींगबर  सोसायटी

५)अरुणा पाटील ( संस्कार  भारती )


 ---------------------------------------------------------------

किल्ले स्पर्धेचा निकाल


१)सद्गुरू सोसायटी ( किल्ले प्रतापगड )

२)तिसाई कॉलिनी चिंचपाडा ( मुरुड –जिंजारा )

३) राधाकृष्ण पार्क  

४)साई गणेश सोसायटी

५)नवजीवन सोसायटी ( विजयदुर्ग )

६)गोकुळ नगरी ( भाल )

७) साईधाम सोसायटी ‘

८)जय हनुमान सोसायटी

 

Post a Comment

0 Comments