एंटानो आणि हरिनी यांनी 'क्लोझ द डील' कार्यक्रमाचे आयोजन केले

■भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देऊन उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट ~


मुंबई, ५ डिसेंबर २०२१ : एक्सलन्स इन्स्टॉलेशन टेक्नोलॉजीचे (ईआयटी) एक्सलेरेटर्स व सह निर्माते एंटानो आणि हरिनी ह्यांनी “क्लोझ द डील (सीटीडी)” कार्यक्रमाचे आयोजन केले. ह्या कार्यक्रमामध्ये १५० पेक्षा जास्त उद्योजकांनी, बिजनेस मालकांनी, कॉरपोरेट व्यावसायिकांनी, एमएसएमई नेत्यांनी सहभाग घेतला व त्यांच्या आयुष्यातल्या सर्वांत महत्त्वपूर्ण डीलला व वेळ वाचवणा-या लेगसी परिणामांना त्यांनी पूर्ण केले.


       २ टप्प्यांमध्ये झालेल्या क्लोझ द डीलमुळे व्यक्तिगत मर्यादा, मानसिकतेतील त्रुटी ह्यांना ओळखून त्यांचे निराकरण करून व्यक्तीला सक्षम केले गेले. एंटानो आणि हरिनी ह्यांनी सहभागी व्यक्तींना आवश्यक मानसिकतेचा अंगीकार, क्षमता, सुप्त संधींना ओळखण्यासाठीचे धोरणे आणि अतिशय महत्त्वपूर्ण डील पूर्ण करण्याचे कौशल्य ह्यासाठी सहाय्य केले. लक्षावधी लोकांच्या हृदयांना जिंकण्यासाठी जागतिक नेत्यांनी वापरलेल्या भाषा कौशल्याच्या शैलीचा आणि योग्य भावनांना चालना देण्यासह इतर बाबीही सहभागींनी आत्मसात केल्या.


       ईईटीचे सह निर्माते एंटानो सोलार जॉन ह्यांनी म्हंटले, “अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि देशामध्ये रोजगार संधी निर्माण करण्यासाठी आपल्याला अधिक उद्योजकांची गरज आहे. त्यामुळे क्लोझ द डील हा कार्यक्रम आहे ज्यामध्ये इच्छुक लोक आवश्यक व्यक्तिगत बदल व मानसिकतेमधील बदल आत्मसात करू शकतात आणि आपल्या व्हेंचर्सच्या शुभारंभासाठी धोरणे ठरवू शकतात, उत्तम दर्जाचे प्रशिक्षण प्राप्त करू शकतात, प्रतिभासंपन्न व्यक्तींना सहभागी करून घेऊ शकतात व इतरही अनेक गोष्टी करू शकतात.”


        ईआयटीच्या सह निर्मात्या हरिनी रामचंद्रन ह्यांनी म्हंटले, “५०,००० पेक्षा अधिक ब्रेकथ्रूजसह आम्ही जगातील सर्वांत मोठा वन टू वन मेंटरिंग प्लॅटफॉर्म आहोत. सगळ्यांसाठी एकच पद्धतीच्या दृष्टीकोनाऐवजी आम्ही व्यक्तीकडे बघतो व त्यांना व्यक्तिश: आवश्यक असलेल्या बदलांसाठी त्यांना सज्ज करतो ज्यामुळे ते व्यक्तिश: पुढे जाऊन कमी वेळेत आपला विशिष्ट वारसा (लेगसी) निर्माण करू शकतात.”

Post a Comment

0 Comments