ओमीक्रोन रोखण्यासाठी महापालिका सज्ज, परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणार, नागरिकांचे सहकार्य आवश्यक ....आयुक्त सुधाकर देशमुख


भिवंडी , प्रतिनिधी  :  ओमिक्रोन हा कोरोनाचा नवीन विषाणू अधिक झपाट्याने पसरणारा असून त्याचा संसर्ग रोखण्यासाठी कोवीड अनुरूप,  सर्व गोष्टी ज्यामध्ये मास्क, सनिटेझर, सुरक्षित अंतर, बंधनकारक आहे, तसेच कोवीड बाबतच्या वेळोवेळी दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे, कोविड अनुरूप पालन नसेल तर दंडात्मक कारवाई करणार आहे कोवीडचा  प्रभाव रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य देखील आवश्यक आहे, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले.


           भिवंडी निजामपूर  महानगरपालिकेच्या कोवीड  सद्यस्थिती बाबत टास्क फोर्सची  तातडीची बैठक  आयुक्त सुधाकर देशमुख  यांनी  घेतली त्यावेळी, आयुक्त देशमुख बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी कारभारी खरात, जागतिक आरोग्य संघटनेचे भिवंडी संमंनवयक डॉ.किशोर चव्हाण, डॉ. वर्षा बारोड चौधरी, भिवंडी वैद्यकीय व्यावसायिक संघटना अध्यक्षा डॉ.उज्ज्वला बर्दापूरकर, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, सर्व प्रभाग अधिकारी, सर्व 15 आरोग्य केंद्र वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपस्थित होते. 


         आयुक्त देशमुख म्हणाले की, ओमिक्रोन हा कोरोनाचा नवीन विषाणू आहे, याची शहरात साथ पसरू नये याची सर्व बाबतीत तातडीने काळजी घेण्यात येत आहे. याबाबत भिवंडीमध्ये जे कोणी परदेशातून येत आहेत , त्यांच्याशी तातडीने संपर्क साधण्यात येत आहे, परदेशातून आलेल्या नागरिकांनी कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली आहे किंवा याची खातरजमा करणे आवश्यक आहे. 


         ओमिक्रोनचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता लसीकरण वाढवणे आवश्यक आहे.  लसीकरणामुळे कोविड होत नाही असे नाही, मात्र त्यामुळे तीव्र आजाराची शक्यता कमी आहे.  त्यामुळे तातडीने लसीकरण होणे गरजेचे आहे. लसीकरण हे मुख्य सूत्र पाळायला हवे असेही आयुक्त सुधाकर देशमुख म्हणाले. कोरोना बाबत  यासाठी पालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे ती चालू राहणार आहे.  दरम्यान राज्य कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत परदेशातून येणा-या प्रवाशांना लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार परदेशी प्रवास करून येणाऱ्या सर्व नागरिक व त्यांचे संपर्कात येणारे नातेवाईक यांच्या तपासण्या करण्यात येणार आहे.


           त्यात जर पॉझिटिव आल्यास त्याला संस्थात्मक, गृह  विलगीकरण करणे आवश्यक आहे, असे आयुक्त देशमुख यांनी नमूद केले. जे नागरिक याकामी सहकार्य करणार नाहीत त्यांचे विरोधात गुन्हे देखील दाखल केलं जातील. त्यामुळे भिवंडी शहरात परदेशातून मिळणाऱ्या सर्व नागरिकांवर पालिका लक्ष ठेवून   आहे. जे नागरिक परदेशातून येतील त्यांनी याबाबतची माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय आरोग्य विभागाला देणे आवश्यक आहे. 


         तसेच लस न घेणाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयात बंदी करण्यात येणार आहे. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लस घेतली किंव्हा नाही याची देखील तपासणी करण्यात येणार असून, ज्या  ठिकाणी मोठ्या प्रमाणात  नागरिक एकत्र येत आहेत, त्या ठिकाणी  नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून दोन्ही लसी घेतल्या किंवा याची खातरजमा करण्याकरता विशेष पथक नेमण्यात येणार आहे. जे कोणी नागरिक लस घेणार नाहीत आणि त्यांच्या विरुद्ध साथ रोगप्रतिबंधात्मक नियमांचा अंतर्गत  कोवीड नियमांचे पालन केले नाही म्हणून नागरिकांकडून दंडात्मक कारवाई  करण्यात येणार आहे.  


        जर दोन लसी न घेतलेल्या व्यक्तीला शहरात सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळले तर त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. असे देखील आयुक्त सुधाकर देशमुख यांनी टास्क फोर्सच्या  मीटिंगमध्ये सांगितले. साथ रोग प्रतिबंधक कायदा अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कोविड अनुरूप   पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला असा कसूर केल्यास प्रत्येकी प्रसंगी रुपये पाचशे रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे. तसेच ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक इत्यादींवर कोविड  अनुरूप वर्तन करणे अपेक्षित आहे. 


         अशा व्यक्ती किंवा संस्थेच्या आस्थापनाच्या कोणत्याही  जागेत जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आल्यास त्या व्यक्तीवर व दुकाने यावर दंड लावण्यात येईल, त्या व्यतिरिक्त अशा संस्थांना, दुकाने आस्थापनां यांना देखील  रुपये दहा हजार दंड आकारण्यात येणार आहे. जर कोणतीही संस्था किंवा अस्थापना कोवीड अनुरूप   व्यवहार करीत नसल्याचे दिसल्यास त्या दुकादारांकडून एक आपत्ती म्हणून covid-19 अधिसूचना अमलात असेपर्यंत अशी संस्था किंवा अस्थापना बंद करण्याची कारवाई करण्यात येईल.


        तसेच प्रत्येक प्रसंगी रुपये पन्नास हजार रुपये दंडास पात्र असतील, जर असे वारंवार कसूर केल्यास सदर दुकान, आस्थापना बंद करण्यात येतील. कोणत्याही प्रवासी साधनात  प्रवास करणाऱ्या व्यक्तीस कोविड अनुरूप वर्तन केले जात नसेल त्या इसमास  पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच वाहन सेवा पुरवणारे वाहन चालक मदतनीस किंवा वाहक यांनादेखील पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल. 


        तसेच या बाबतीत वाहन मालक परिवहन एजन्सी  यांना देखील वेळ प्रसंगी दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल. वारंवार याबाबत कसूर केल्यास कोवीड  अधिसूचना अमलात असेपर्यंत वाहन मालक एजन्सी यांचे लायसन जप्त करून त्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. शहर कोविड मुक्त ठेवायचे असेल तर, कोवीड नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे, याकामी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments