ठाणकर पाडा प्रभागातील रस्त्यांना मिळाली झळाळी पथदिव्यांसह इतर विकास कामांचे लोकार्पण नगरसेवक मोहन उगले यांच्या प्रयत्नांना यश


कल्याण , प्रतिनिधी  : कल्याण पश्चिमेतील ठाणकर पाडा प्रभागातील रस्त्यांवर पथदिवे लावल्याने झळाळी मिळाली आहे. येथील पथदिवे, चेकर्स लाद्या आदी विकासकामांचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. शिवसेना विभागप्रमुख आणि नगरसेवक मोहन उगले यांच्या प्रयत्नाने ही कामे झाली  आहेत. यावेळी उपजिल्हा प्रमुख अरविंद मोरे, माजी नगरसेवक विद्याधर भोईर, विजय काटकर, आदी मान्यवर उपस्थित होते.    


      ठाणकर पाडा येथील विविध परिसरात गेल्या २० वर्षांपासून बसविलेले विद्युत पोल होते. यामुळे पुरेसा प्रकाश पडत नव्हता तसेच अनेक पोल हे गंजल्याने हे लाईटचे पोल बदलण्याची मागणी नागरिकांनी शिवसेना शाखेत विभागप्रमुख आणि नगरसेवक मोहन उगले यांना केली होती.  उगले यांनी या मागणीची दखल घेत पालिकेकडे पाठपुरावा करत येथील लाईटच्या पोलांचे काम मार्गी लावले आहे. त्यानुसार नागेश्वर मंदिर, सिद्धिविनायक सोसायटी, गणेशकृपा कॉलनी ठाणकरपाडा येथे लाईटपोल टाकून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.


त्याचप्रमाणे औदुंबर आळी जवळ, गणेशकृपा चाळ ३ व ४ येथे चेकर्स लाद्या बसविल्या होत्या त्यांचे देखील लोकार्पण करण्यात आले. तसेच शिवांजली निवास, बालाजी, एकविरा निवास येथे ड्रेनेज लाईनच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.


            दरम्यान यावेळी शहर संघटक सुजाता धारगळकर,महिला शाखा संघटक नेत्रा उगले, शाखा प्रमुख अनंता पगार, स्वप्नील मोरे मीना सावंत, पिंटू दुबे, राजेश साबळे, रितेश पाबळे, प्रदीप मोरे, दीपक भालेराव, संदीप पगारे, निलेश चोळकर, नितीन कदम, नरेश गडकर, बबन बिन्नर, उमेश भुजबळ, सचिन भाटे, आशिष झाडे, प्रदीप हुले, निलेश चोणकर आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments