भाजपाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे.. शिवसेनेची भाजपवर टीका


डोंबिवली ( शंकर जाधव ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची केलेली विटंबना आणि या निंदनीय कृतीला शुल्लक गोष्ट असे संबोधणारे कर्नाटक राज्याचे भाजप मुख्यमंत्री यांचा करावा तेवढा निषेध कमीच आहे, त्यांनी जाणीवपूर्वक असा उल्लेख केलेला आहे, ज्यातून महाराष्ट्राचा अपमान होईल.भाजपा नेत्यांकडून वारंवार महाराष्ट्रातील मराठी शाहीला असे चिथावणी खोर उल्लेखाने अपमानित करण्याचा प्रयत्न होत आहे, जेणेकरून महाराष्ट्रात असंतोषाचे वातावरण निर्माण होईल.भाजपाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर फक्त निवडणुकीपुरता केला जातो.  उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी डोंबिवलीत सांगितले.


           युवा सेनेच्या डोंबिवलीच्या वतीने किल्ले बांधणी स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा  पूर्वेकडील ठाकूर सभागृहात पार पार पडला.यावेळी ते बोलत होते.संपूर्ण सभागृह डोंबिवलीतील शिवप्रेमी बालक आणि तरुणांनी खचाखच भरले होते, या बक्षीस वितरण सोहळ्यात शिवसेना डोंबिवली उपजिल्हा प्रमुख  सदानंद थरवळ यांनी डोंबिवली शहर शाखेच्या वतीने केंद्रातील  भाजपा सरकारचा आणि कर्नाटकच्या भाजपा मुख्यमंत्र्यांचा तिखट शब्दात जाहीर निषेध केला.


         बक्षीस वितरण सोहळ्यात शिवप्रेरणा गीत व पोवाड्यांनी, छत्रपती शिवरायांचा जय जय कार, जय भवानी, जय शिवाजी आणि हर हर महादेवच्या गजराने सारे सभागृह डोंबिवलीच्या या बाल तरुण मावळ्यांनी दणाणून सोडले होते.डोंबिवलीच्या किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन युवा सेना डोंबिवली शहर अधिकारी सागर जेथे यांनी केले होते. या बक्षीस वितरण सोहळ्यास उपजिल्हाप्रमुख राजेश कदम शहर प्रमुख राजेश मोरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख तात्यासाहेब माने, वैशाली दरेकर, मंगला सुळे, कविता गावंड, संतोष चव्हाण, खामकर, सतीश मोडक युवा सेनेचे राहुल म्हात्रे, सागर दुबे कौस्तुभ फडके स्वप्निल वाणी, महेश कदम, सागर इंगळे यांच्यासह आजी माजी नगरसेवक व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments