आईच्या स्मरणार्थ विद्यार्थिनीला घेतले शैक्षणिक दत्तक

 


कल्याण, प्रतिनिधी  : समाजसेवक डॉ. धिरेश हरड यांच्या आईचे नुकतेच अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. निधनापूर्वी हरड यांच्या आई ह.भ.प. विमलबाई यांनी एका विद्यार्थिनीच्या पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी घेण्याची इच्छा कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. दरम्यानत्यांचे निधन झाल्यानंतर हरड कुटुंबाने आईच्या इच्छेनुसार सबंधित विद्यार्थिनीच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत तिला ११ वी सायन्सची पुस्तके सुपूर्द केली.


डॉ. धिरेश हरड यांचे सर्व कुटुंबीय मुरबाड तालुक्यातील शिंदीपाडा या मूळ गावी स्थायिक असून त्यांच्या आईंचे तेथेच निधन झाले होते. निधनापूर्वी काही दिवस आधी ह.भ.प. विमलबाई यांना परिचयातील जगन्नाथ जाधव यांनी मुरबाड तालुक्यातील उमरोली (पिराची) गावातील गरीब कुटुंबातील कु. वैष्णवी जगनाथ जाधव ही विद्यार्थिनी घराच्या परिस्थितीमुळे शैक्षणिक साहित्य घेऊ शकत नसल्याने तिला मदतीची गरज असल्याचे सांगितले होते. सदर विद्यार्थिनीला मदत करण्याची इच्छा विमलबाई यांनी कुटुंबात व्यक्त केली होती.


 दरम्यानत्यांचे दु:खद निधन झाले. आईचे उत्तरकार्य पार पाडत असताना हरड कुटुंबीयांनी कु. वैष्णवी हिच्या कुटुंबीयांकडे ११ वी सायन्सची पुस्तके सुपूर्द करीत तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगितले. यावेळी आईला श्रद्धांजली अर्पण करताना डॉ. धिरेश हरड म्हणाले कीआई आपले निघून जाण्याने आम्ही पोरके झालो. आपली शिकवण आणि आठवण आमच्या मनात चिरंतन तेवत राहील. आईच्या निधनानंतर तिची इच्छा पूर्ण करीत हरड कुटुंबीयांनी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहील्याचे बोलले जात आहे.


          यावेळी कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते आत्माराम सासेमुरबाड पारमार्थिक संघाचे जगन्नाथ शिंदेसंभाजी शिंदेनगरसेवक एकनाथ भोईरएकता भोईरमोहन सासेज्येष्ठ समाजसेवक अनंत साबळेतुकाराम साबळेपांडुरंग हरड गुरुजीरमेश हरडसुनील हरडअरुण हरडअनिल हरडधीरेश हरडम्हसाचे सरपंच रमेश कुर्लेसंतोष साबळेपांडुरंग प्रतिष्ठानचे अतुल मानेप्रतिष्ठानच्या संरक्षण विभागाचे प्रमुख महेंद्र उबाळेकायदे विभागाचे प्रमुख अॅड. राजेश गायकवाडबाळाराम भावार्थेविठ्ठल जवकएजाज शेखवसीम शेखनितीन शिंदेदिनेश शिंदेसागर शिंदेसुरेश हरडगुरुनाथ भोईरकाशिनाथ पष्टेह.भ.प. मधुकर मलिक गुरुजीडॉ. काशिनाथ भोईरसंगीता पष्टेविजया पष्टेरेखा कंटे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर व गावकरी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments