डोंबिवलीत शरद महोत्सवाचे आयोजन राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते उदघाटन कोरोनानंतर आता होणार महोत्सवांची मायंदाळी


कल्याण, प्रतिनिधी  : गेली दोन वर्षे कोरोना महामारीने शहरात होणाऱ्या महोत्सवार संक्रात आली होती. सांस्कृतिक डोंबिवली महोत्सवाचे आगार असूनही कोरोनामुळे सर्व थंड पडलं होतं. मात्र आता कोरोनचा प्रभाव कमी होऊन सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. यानंतर महोत्सवाचा पहिला बार राष्ट्रवादीच्या शरद महोत्सवाने उडणार आहे. 


        पूर्वेकडील नेहरू मैदानात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त `नव्या युगाचा नवा उत्सव – शरद महोत्सव`२०२१ डोंबिवलीत होत आहे. या महोत्सवाचे उदघाटन राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती डोंबिवली महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड यांनी दिली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील, १४२ विधानसभा महिला अध्यक्षा (कल्याण पूर्व) मीनाक्षी आहेर आदी पदाधिकारी उपस्थित होते.   


पूर्वेकडील नेहरू मैदान येथे शुक्रवार १७ तारखेला शरद महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात कला-संस्कृती,परंपराक्रीडा व गुह उद्योगावर भर दिला आहे. १७ ते २६ डिसेंबर पर्यत महोत्सव आयोजित सुमारे शंभर महिला बचत गट सहभागी होणार आहेत. या महोत्सवात बचत गटातील महिलांना त्यांच्या उत्पादनासाठी मोठी बाजारपेठे मिळणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी नेते तसेच पदाधिकाऱ्यां नियोजन केले असून यामध्ये सर्व प्रकारच्या नियमांचे पालन करण्याचे तंत्र अवगत केले आहे. या महोत्सवासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्या असल्याचेही सारिका गायकवाड यांनी सांगितले.


तर कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील म्हणालेमहिलांना सक्षम होण्यासाठी तसेच बचत गटातील महिलांना या महोत्सवाच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि अनुभव मिळणार आहे. कल्याण डोंबिवली महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड१४२ विधानसभा महिला अध्यक्षा मीनाक्षी आहेर व ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर पाटील यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदेकार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटीलडोंबिवली विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी आदी नेते शरद महोत्सव” यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.

Post a Comment

0 Comments