मित्रांना घेऊन घरफोड्या करणाऱ्या रिक्क्षा चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या कल्याण बाजारपेठ पोलिसांची कारवाई


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : काही महिन्यांपासून कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. या वाढत्या घटनामुळे पोलीस देखील चक्रावले होते पोलीस या चोरट्यांचा शोध घेत होते. या गुन्ह्यांच्या तपासा दरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे.          गणेश शिंदे अस या चोरट्याच नाव असून तो  रिक्क्षा चालक आहे. त्याने त्याचे मित्र सिकंदर शहा आणि मुन्नासोबत अनेक घरफोडय़ा केल्या होत्या. आत्तार्पयत पोलिसांनी चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. जवळपास दोन लाखाचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला आहे. पुढील तपास पोलिस, करीत असल्याची माहिती एसीपी उमेश मानेपाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments