जुनी विहीर बुजवत पिंपळाचे झाड तोडत इमारतीचे बांधकाम

 

■डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाची कारवाईची मागणी..


कल्याण , प्रतिनिधी  : कल्याण पश्चिमेतील आंबेडकर रोड, शौकत अली चौक जुना मच्छी मार्केट परिसरामध्ये अनेक वर्षापासून एक विहीर होती परंतु आता ती विहीर कल्याण मधील एका विकासकाकडून बुजविण्यात आली असून अनेक वर्षाचे पिंपळाचे झाड तोडून इमारत बांधण्याचे काम सुरू आहे.            या संदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुद्रे यांनी संबंधितांवर विहीर बुजवणे व झाडाची कत्तल करणे असे गुन्हे दाखल करून प्रशासनाने योग्य तपास करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले असून यावेळी जयपाल कांबळे, नदीम खान, राजू खान, नाना गायसमुद्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


         कल्याण पश्चिमेकडील मच्छी मार्केट आंबेडकर रोडशौकत अली चौकाजवळ अनेक वर्ष जुने पिंपळाचे झाड होते ते तोडून तेथील विहीर देखील बुजवण्यात आली आहे. या विहिरीचा व झाडाचा उपयोग परिसरातील लोक करत असतवेळोवेळी परिसरातील अनेक लोक या विहिरीतून आपली व आपल्या कुटुंबाची तहान भागवत असत.


           जिवंत झाडे तोडून विहीर बुजवल्याने परिसरातील रहिवाशांसह पर्यावरणाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेहि दोन्ही कामे बिल्डरने आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी केली आहेत.  त्यामुळे  संबंधितांवर विविध कलमान्वये तसेच प्रदूषण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गयासमुंद्रे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments