डोंबिवलीतील सागाव मंदिरात खंडोबा देवाचा चंपाषष्ठी उत्सव साजरा


डोंबिवली , प्रतिनिधी :  गुरुवारी  चंपाषष्ठी असल्याने डोंबिवलीतील सागाव खंडोबा मंदिरा देवाचा तळी भंडारा भरण्यात आला होता. हा भंडारा भरण्यासाठी  गावकरी जमले होते. आगरी - कोळी आणि सर्वच मराठी माणसाच्या मनात घर करणाऱ्या आणि भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या खंडोबा देवाचा चंपाषष्ठी  उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. 


        चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. म्हणून मार्गशीर्ष महिन्यात 'शुद्ध षष्ठी' ही तिथी 'चंपाषष्ठी' म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी 'मल्हारी नवरात्री'ला प्रारंभ होतो. त्यामुळे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत सहा दिवसांची नवरात्र असते. यालाच 'खंडोबाची नवरात्र' असे म्हणतात.


         याच निमित्ताने सागाव येथे देखील जेजुरी गडावरून आणलेला भंडारा देवाला वाहिला. दरवर्षी हा उत्सव साजरा करत असल्याचे देवळाच्या व्यवस्थापकांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments