इराणी वस्तीतून अट्टल चोराला पकडण्यात कोळसेवाडी पोलिसांना यश साडे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत


कल्याण, कुणाल म्हात्रे  : कल्याण कोळसेवाडी पोलीसांना एका अट्टल चोराला पकडण्यात यश आले आहे. अलिहसन जाफरी असं या चोरट्याच नाव आहे. २२ वर्षीय आलिहसन हा सराईत गुन्हेगार असून चैन स्नेचिंग व दुचाकी चोरी मध्ये त्याचा हातखंडा आहे. चैन स्नेचिंग करण्यासाठी तो आधी महागड्या दुचाक्या चोरायचा त्यानंतर या चोरलेल्या दुचाकीवरून चैन स्नेचिंग करायचा व ही दुचाकी रस्त्यात उभी करून तेथून पळ काढायचा.


कल्याण कोळसेवाडी परिसरात चैन स्नेचिंग, दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कोळसेवाडी पोलिसांनी चार पथके नेमली व या चोरट्यांचा शोध सुरु केला. खबऱ्यां मार्फत त्यांना अलीहसन हा आंबिवली इराणी वस्तीत राहत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने आंबिवली इराणी वस्तीत सापळा लावून अली हसनला अटक केली. त्याच्याकडून पाच मोटरसायकल तीन साखळ्या ४  लाख ५३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


आतापर्यंत कल्याण-डोंबिवली, भिवंडीठाणे, मुंबई या ठिकाणी देखील चोऱ्या केल्याचे तपासात समोर आले असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत असल्याची माहिती एसीपी उमेश माने पाटील यांनी दिली. दरम्यान कल्याण नजीकच्या आंबिवली येथील इराणी वस्तीतून या आधी देखील अनेक सोनसाखळी चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. अलीहसनच्या अटकेनंतर ही वस्ती पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आली आहे. 

Post a Comment

0 Comments